सात टीएमसी पाणी सोडून जिल्ह्याची वाट लावली
आमदार हसन मुश्रीफ; अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय फरक पडणार नाही
कोल्हापूर, ता. १६ : अधिकाऱ्यांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत ‘शासन आपल्या दारी काय आणि माज घरात नेलं काय’ काहीही फरक पडणार नाही. लोकांची कामे होणार नाहीत. दूधगंगा प्रकल्पाच्या गळीतीच्या नावाखाली जलसंपदा विभागाने सात टीएमसी पाणी बिनकामाचे सोडून जिल्ह्याची वाट लावली आहे. तर, चिरिमीरीसाठी आंबेओहळचे पाणी चित्री प्रकल्पाला सोडून कर्नाटकचा फायदा करुन दिलल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध प्रश्नासंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘जिल्ह्यात दूधगंगा प्रकल्पात सात टीएमसी पाणी असते तर हजारो एकर करपणारी शेती वाचली असती. कोल्हापूर शहराला एकदिवस आड पाणी देण्याची वेळ आली नसती. पालकमंत्री दिपक केसरकर यांचे कोल्हापूरकडे लक्ष नाही. शासन आपल्या दारी म्हणून कार्यक्रम घेताहेत आणि पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. आठ दिव पाऊस झाला नाही तर खूप मोठे परिणाम भोगावे लागतील अशी परिस्थिती आहे. शासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. शासन आपल्या दारी म्हणून दिल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व माझ्याच योजना आहेत. संजय गांधी निराधार योजना, बांधकाम कामगार योजना, मोफत शस्त्रक्रिया या सर्व योजना मीच तयार केल्या आहेत. त्याच्या योजना हे सरकार राबवत आहे. या योजना राबवण्यास हरकत नाही. पण अधिकाऱ्यांनी घरा-घरात जावून माहिती घेतली पाहिजे आणि त्यांना योजनांचा लाभ दिला पाहिजे.’
आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि मी स्वत: जनता दरबार घेवून ज्या-त्या अधिकाऱ्यांना तत्काळ प्रश्न साडेवण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार कामही होत होते. पण कोरोनामुळे हा उपक्रम बंद राहिला. जनता दरबारमुळे लोकांचे प्रश्न सुटतात. सर्व अधिकारी आपल्यासेाबत घेवूनच ते प्रश्न सोडवले जातात. त्यामुळे असे कार्यक्रम घेण्यास हरकत नसल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, स्मिता माने, शक्ती कदम, दिनेश खट्टे, शिरीष देसाई, वसंतराव धुरे उपस्थित होते.
चौकट
‘एसटी भरुन माणसं केवळ भाषण ऐकायलाच’
परवा त्यांनी एसटी भरभरुन माणसं आणली. शासन आपल्या दारी म्हणून ज्या गोष्टी देतो म्हणून सांगितल्या त्या आम्हाला दिलेल्या नाहीत म्हणून लोक आमच्याकडे येत आहेत. हे आता पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारले पाहिजे. एसटी भरुन माणसं आणली ती केवळ भाषण ऐकायलाच होती. त्यांची कामे मात्र केली जात नाहीत, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.