कोल्हापूर

कचरा बैठक

CD

नालेसफाईसाठी आठवड्याची मुदत
पालिकेत बैठक; सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा
कोल्हापूर, ता. १६ : आठवड्याभरात कचरा उठाव तसेच नालेसफाईत सुसूत्रता आली पाहिजे. काही कारणाने भागात टिप्पर गेला नसल्यास दुपारी पाठवला पाहिजे. उद्यापासून त्याचे नियोजन करून कामात सुधारणा करा; अन्यथा कडक कारवाई होईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिला.
आज ‘सकाळ’मधून ‘प्रशासन सुस्त, नागरिक त्रस्त’ ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांनी आज आरोग्याधिकारी, आरोग्य निरीक्षकांची बैठक घेतली. त्यात त्यांनी आठवड्याची मुदत दिली. नाल्यातील प्लास्टिकचा कचरा ही गंभीर बाब असून पाऊस सुरू होण्यापूर्वी त्याचा उठाव करावा. तसेच कचरा उठाव करण्यात होत असलेल्या कुचराईबाबतही साऱ्यांना इशारा दिला.
आडसूळ म्हणाले, ‘‘टिप्पर पोहचत नसल्याने वा जादा फेऱ्या करत नसल्याने भागात रस्त्यावर कचरा पडण्यास सुरूवात होते. अनेक टिप्पर चालक दुसरी फेरी न करता कुठेतरी थांबून असतात. त्यामुळे त्या भागातील नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. जीपीएस ट्रॅकिंगद्वारा ते स्पष्ट होत असून अशा टिप्परचालकांवर कारवाई केली पाहिजे. काही कारणाने दुसरी फेरी ठरलेल्या वेळेत झाली नाही तर दुपारपर्यंत ती पूर्ण झाली पाहिजे. तरच कचरा रस्त्यावर येणार नाही. आरोग्य निरीक्षकांनी आपापल्या भागातील टिप्परचे नियोजन व्यवस्थित केले नाही तर आठवड्यानंतर तक्रार येणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.’’ या वेळी आरोग्य निरीक्षकांना येणाऱ्या अडचणी, टिप्परचे प्रश्‍न याचीही माहिती घेतली.
------------------
चौकट
रस्ते दुरुस्तीबाबत नागरिकांच्या तक्रारी
रस्ते खराब असून नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष दिले जात नसल्याचेही बातमीत मांडले होते. आज बातमी प्रसिद्ध होताच अनेकांनी महापालिकेकडे केलेले प्रयत्न ‘सकाळ’कडे मांडले. रेड्याची टक्कर ते मालती अपार्टमेंटपर्यंतचा रस्ता धोकादायक बनला आहे. तो वाहतूक योग्य बनवावा, असे पत्र स्थानिक नागरिक रमेश ओसवाल यांनी गेल्या महिन्यात दिले होते. त्याची दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

Latest Marathi News Live Update : ठाण्याची हवा बिघडली 25 हून जास्त हॉटस्पॉट..

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT