वृक्षतोडप्रकरणी
५ लाखांवर दंड
इचलकरंजी ः येथील वखार भाग परिसरातील जुन्या कब्रस्थानमधील पाच झाडे तोडल्याप्रकरणी महापालिकेने संबंधित संस्थेस ५ लाख ११ हजारांचा दंड केला. मुदतीत दंड न भरल्यास फौजदारी दाखल करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मनपाचे उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर यांनी माहिती दिली. वखार भाग परिसरातील जुन्या कब्रस्थानमधील पाच झाडे तोडली होती. विनापरवाना वृक्षतोड झाल्याची तक्रार झाल्यानंतर मनपाने तपासणी झाली. यामध्ये रेनट्री, लिंब, बाभळ, पेल्ट्रो फार्म, सुबाभळ अशी एकूण पाच झाडे तोडण्यात आल्याचे समोर आले. या झाडांच्या वयानुसार मनपाने प्रत्येक झाडाची स्वतंत्र दंडात्मक आकारणी केली. त्याची एकूण रक्कम ५ लाख ११ हजार १०० इतकी आहे. याबाबत संबंधितांना लेखी खुलाखा केला होता. मात्र तो खुलासा प्रशासनाकडून अमान्य करण्यात आला. त्यामुळे दंडाची रक्कम कायम करण्यात आली. ही दंड भरण्याची मुदत संबंधित संस्थेला दिली आहे. मुदतीत दंड न भरल्यास फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.