औदुंबर पाटील यांची नवी मुंबईत बदली
कोल्हापूर, ता. १६ ः आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतील निरीक्षक औदुंबर पाटील यांची आज नवी मुंबई येथे बदली झाली. त्यांच्यासाह अन्य सहा जणांचा समावेश आहे. राज्यात कालावधी पूर्ण झालेल्या निःशस्त्र पोलिस निरीक्षकांच्या आज बदल्या झाल्या. एकूण ३३६ निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून, काहींना पदोन्नती दिली; तर काहींना मुदतवाढही दिली आहे. कोल्हापुरातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक औदुंबर पाटील यांची बदली नवी मुंबई येथे झाली. तसेच, येथील अशोक भवड यांची अहमदनगर येथे बदली झाली. विकास भुजबळ यांची गुन्हे अन्वेषण विभागातून, अविनाश कवठेकर यांची दहशतवादविरोधी पथकातून, किशोर शिंदे यांची राज्य गुप्तवार्ता विभागातून कोल्हापूर येथे बदली झाली. तसेच, केतकी खोत यांची गुन्हे अन्वेषण विभागातून कोल्हापुरात बदली झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.