कोल्हापूर

इचलकरंजीतील समस्यांबाबत ‘इनाम’चे निवेदन

CD

इचलकरंजीतील समस्यांबाबत ‘इनाम’चे निवेदन

इचलकरंजी, ता.१८ : इचलकरंजी शहरातील वाहतुक समस्या, अर्धवट गटारी यासह अन्य समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, या मागणीचे निवेदन इचलकरंजी नागरिक मंचतर्फे महापालिका प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांना दिले.
शहरातील पंचवटी टॉकीज, तीन बत्ती चौक, थोरात चौक, कापड मार्केट, राजीव गांधी भवन परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे येथे वाहतुक कोंडी व अपघात होत असतात. येथे होणारी वाहतूक कोंडी मार्गी लावावी. मंगळवार व शुक्रवार आठवडा बाजारावेळी आवाडे टॉकीजसमोरून अवजड वाहतूक बंद करून रिंग रोडमार्गे करावी. सुतार मळा येथे सुरू असलेले डांबरीकरण काम निकृष्ट असून त्याची चौकशी करावी. सांगली रस्ता डिपीला दाखवल्याप्रमाणे मोठा व्हावा. गटारीची व्यवस्था करावी. वंदे मातरम क्रीडांगणासमोर स्पीडब्रेकर करावे. राजर्षि छत्रपती शाहू महाराज पुतळ्यास सुरक्षारक्षक नेमणूक करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. शिष्टमंडळात राजु कोन्नुर,राम आडकी,उदयसिंह निंबाळकर, संजय डाके, महेंद्र जाधव, लक्ष्मण पाटील, दीपक अग्रवाल, डॉ. सुप्रिया माने, कल्पना माळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coastal Road Accident: BMW फ्लायओव्हरवरून खाली कशी कोसळली? धक्कादायक घटनेचा CCTV व्हायरल

UPI Transaction Fee : ऑनलाइन व्यवहारांना लागणार ब्रेक? केंद्र सरकारच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना बसणार लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड, UPI शुल्क बदलामुळं वाढली चिंता

Vastu Benefits of Shankh: घरात शंख ठेवण्याचे 'हे' आहेत फायदे; वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या शंखाचा योग्य प्रकार अन् दिशा!

Marathi News Live Updates : ‘टीएमसी हा राजकीय पक्ष नव्हे, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’; भाजप आमदाराचा हल्लाबोल

Bhilai Steel Scrap Theft : कोट्यवधींचे लोखंडी भंगारची चोरी, दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT