कोल्हापूर

गुड्डीसिंगचा ‘डीकेएएससी’तर्फे सत्कार

CD

ich1812.jpg
10051
इचलकरंजी : अग्निवीर सैन्य दलात भरती झालेल्या गुड्डीसिंग हिचा सत्कार डीकेएएससी महाविद्यालयातर्फे केले.
गुड्डीसिंगचा ‘डीकेएएससी’तर्फे सत्कार
इचलकरंजी : अग्निवीर सैन्य दलात भरती झालेल्या गुड्डीसिंग हिचा सत्कार डीकेएएससी महाविद्यालयातर्फे केला. ती सध्या बीएससी भाग- २ मध्ये शिकत असून एनसीसी कॅडेट म्हणून तीन वर्षे पूर्ण केली आहेत. अग्निवीर सैन्य भरती झालेली ती महाविद्यालयाची पहिली मुलगी ठरली आहे. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते तिचा सत्कार केला. तिला मेजर मोहन वीरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
---------
ich1813.jpg
10052
पल्लवी माळीचे यश
इचलकरंजी : येथील पल्लवी बाबासाहेब माळी हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळवले. तिची आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित रेंज फॉरेस्ट परीक्षेतून अधिकारी म्हणून निवड झाली आहे. पल्लवी तीन वर्षापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करत आहे. यशाबद्दल तिचे कौतुक होत असून तिला आई, वडील, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
------
ich1814.jpg
10053
इचलकरंजी : रोटरी क्लबच्यावतीने अतिग्रे व रूकडी भागातील रूग्ण सेवेकरीता ॲम्बुलन्स प्रदान करण्यात आली.
रोटरीतर्फे ॲम्बुलन्स प्रदान
इचलकरंजी : रोटरी क्लबच्यावतीने अतिग्रे व रूकडी भागातील रूग्ण सेवेसाठी ॲम्बुलन्स प्रदान केली. शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनी घाटगे यांच्याहस्ते नवीन ॲम्बुलन्सचे उद्‌घाटन केले. यासाठी रोटरी क्लब ऑफ अतिग्रे, नारायणदास दामोदर भंडारे फौंडेशन यांचे सहकार्य लाभले. आयुक्त सुधाकर देशमुख, रोटरी क्लबचे अध्यक्ष सत्यनारायण धूत, सचिव प्रकाश गौड, डॉ. प्रशांत कांबळे, पुष्पा धूत, विजयश्री गौड, मनीष मुनोत आदी उपस्थित होते.
---------
ich1815.jpg
10054
इचलकरंजी : कन्या महाविद्यालयास मैत्री फौंडेशनच्यावतीने ग्रीन बोर्ड वितरीत करण्यात आले.
कन्या महाविद्यालयास ग्रीन बोर्ड
इचलकरंजी : येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयास मैत्री फौंडेशनच्यावतीने ग्रीन बोर्ड वितरीत केले. महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या गरजा लक्षात घेऊन फौंडेशनने महाविद्यालयाला दहा ग्रीन बोर्ड भेट म्हणून दिले. तसेच पाच पंखे व दहा ट्युबलाईटही दिल्या. फौंडेशनचे अध्यक्ष चंद्रप्रकाश छाजेड, सुनिला जोशी, संगीता मुंदडा, विभा पाटणी, ऊर्जा फौंडेशनच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड, सुचिता दिवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्या डॉ. त्रिशला कदम यांनी ग्रीन बोर्ड भेट दिल्याबद्दल मैत्री फौंडेशनचे आभार मानले. प्रास्ताविक प्रा. संगीता पाटील यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. प्रतिभा पैलवान यांनी केले. आभार डॉ. धीरज शिंदे यांनी मानले.
----------
विनायक हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार
इचलकरंजी : विनायक हायस्कूल शहापूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ झाला. एनएमएमएस स्पर्धा परीक्षा, सारथी स्कॉरशीप परीक्षा आदी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. न्यू इंग्लिश स्कुल कबनूरच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुमन चव्हाण, उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सचिव अशोक चव्हाण, आकाराम सावंत, मुख्याध्यापक अशोक हुबळे, उपमुख्याध्यापक शाम कांबळे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय संतोष सावंत यांनी केला. सुत्रसंचालन अशोक सदावर्ते यांनी केले. आभार शाम कांबळे यांनी मानले.
--------
‘डीकेएएससी’मध्ये जिजामाता पुण्यतिथी
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजामाता यांची पुण्यतिथी साजरी केली. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते जिजाऊच्या तैलचित्राचे पूजन केले. प्रास्ताविक डॉ. अनिल जांभळे यांनी केले. आभार प्रा. अरूण कटकोळे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT