कोल्हापूर

आर. आर. अकॅडमीचे सीईटी, नीट परीक्षेत यश

CD

10108
गडहिंग्लज : आर. आर. अकॅडमीत सानिका गाडेचा सत्कार झाला. या वेळी डॉ. अनूप बारदेस्कर, डॉ. स्वाती कमल, डॉ. रणजित कदम, बसवराज खणगावे, एच. रेड्डी आदी उपस्थित होते.

आर. आर. अकॅडमीचे
सीईटी, नीट परीक्षेत यश
गडहिंग्लज, ता. १८ : येथील आर. आर. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सीईटी आणि नीट २०२३ परीक्षेत चांगले यश मिळविले. सानिका गाडे या विद्यार्थीनीने नीट परीक्षेत ६०५ गुण घेवून प्रथम क्रमांक पटकावले. त्यानंतर धैर्य रेडेकरने ४७८, सोनिया देसाईने ४६८ तर हृतिका कांबळे हिने ४३० गुण घेवून चांगले यश मिळविले.
सीईटी परीक्षेत संकेत जाधवने ९९.५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. रिया मरगुद्रीने ९७, धैर्यशील देसाईने ९७.८, श्रेया कुलकर्णी हिने ९६.५, गायत्री पाटीलने ९६, आर्या घोडके ९६ टक्के गुण मिळविले. तसेच जेईई परीक्षेत संकेत जाधवने ९८, श्‍वेता कुंभारने ऑल इंडिया रँकमध्ये १०८० वा तर श्रेया कुलकर्णीने ऑल इंडिया रँकमध्ये ५००० वी आली. अकॅडमीचे मार्गदर्शक माजी नगरसेवक बसवराज खणगावे, डॉ. अनुप बारदेस्कर, डॉ. रणजित कदम, डॉ. सौ. स्वाती कमल-इंगवले यांच्याहस्ते सानिका गाडेसह यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. बारदेस्कर यांनी आर. आर. अकॅडमीच्या विद्यार्थीनीने ६०० गुणाला गवसणी घातले असून प्रत्येकाने आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन केले. डॉ. कमल, डॉ. कदम यांचीही भाषणे झाली. समन्वयिका मंजिरी देशपांडे यांनी अमेरिकेतून व्हीडीओ कॉलद्वारे संपर्क साधत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अकॅडमीचे संचालक प्रा. एच. रेड्डी यांनी प्रास्ताविकात अकॅडमीची माहिती दिली. नाथा रेगडे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT