कोल्हापूर

गुन्हेगारी वृत्त

CD

दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

कोल्हापूर ः शिराळा ते शिरशी (ता. शिराळा, जि. सांगली) मार्गावर भावासोबत दुचाकीवरून जाताना अचानक माकडाने गाडीवर उडी मारल्याने घाबरून रस्त्यावर पडलेल्या सारिका राजाराम महिंद (वय ३८, रा. शिरशी) गंभीर जखमी झाल्या होत्या. शनिवारी (ता.१७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अपघात घडल्यानंतर सारिका यांना शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे शनिवारी रात्री बाराच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्या माहेरी शिराळा येथे गेल्या होत्या. सासरी परत जाताना अपघात झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
........

अपघातात तरुणीचा मृत्यू

कोल्हापूर ः गोरंबे (ता. कागल) येथे अपघातात जखमी झालेल्या मुस्कान शाहरुख मुजावर (वय २९, रा. नंदगाव, ता. करवीर) यांचा सीपीआरमध्ये उपचारादरम्यान रविवारी (ता. १८) सकाळी सव्वादहाच्या सुमारास मृत्यू झाला. गुरुवारी (ता.१५) सकाळी साडेअकराच्या सुमारास अपघात झाला होता. त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
.....

अपघातातील जखमीचा मृत्यू

कोल्हापूर ः पोर्ले तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथील मुख्य रस्त्यावर बस स्टॉपजवळ मंगळवारी (ता.१३) झालेल्या अपघातात जगन्नाथ ज्ञानू खवळे (वय ६९, रा. पोर्ले तर्फ बोरगाव) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. रविवारी (ता. १८) सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC बंडखोरांना राज्यात १३०० मतं मिळवू न शकलेल्या पक्षाचा आधार, शून्यावरून थेट २० खासदार; NCPIचा इतिहास काय? कोण चालवतं?

सरळसेवा पदभरतीची महत्त्वाची फाईल गहाळ, राजशिष्टाचार विभागात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik Vegetable Prices : किचनचे बजेट कोलमडले! टोमॅटो 80 तर वांगी 120 रुपये किलो; पाहा तुमच्या आवडीच्या भाज्यांचे ताजे दर, फळेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर

VIRAL VIDEO: जिंकण्यापूर्वीच खेळाडू सेलिब्रेशन करण्यासाठी मैदानात धावले, फिल्डरची चतुराई पाहून सारेच चक्रावले; अम्पायरही गोंधळले

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

SCROLL FOR NEXT