कोल्हापूर

गुरुपोर्णिमा

CD

13572
कोल्हापूर : ‘पायी तुमचे गुरुराया, हीच माझी देवपूजा’ असा गुरूमहिमा गात सोमवारी सर्वत्र गुरुपौर्णिमा पारंपरिक पध्दतीने उत्साहात साजरी झाली. महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयात विद्यार्थिनींनी गुरुंसोबत असे सेल्फी सेलिब्रेशन साजरे करत अनोखे वंदन केले. (बी. डी. चेचर : सकाळ छायाचित्रसेवा)

गुरुविण सुने सारे,
विश्‍व हे सकल...!
गुरूपौर्णिमा उत्साहात; मंदिरात दर्शनाबरोबरच शाळा-महाविद्यालयांतही गुरुपूजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : ‘गुरुविण सुने सारे, विश्‍व हे सकल..!’, ‘पायी तुमचे गुरूराया, हीच माझी देवपूजा’ असा गुरुमहिमा गात आज शहर आणि जिल्ह्यात गुरूपौर्णिमा पारंपरिक पध्दतीने उत्साहात साजरी झाली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील सर्वच मंदिरांत सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. दरम्यान, आर्ट ऑफ लिव्हिंग, सदगुरू अनिरुध्द उपासना केंद्र, प्रजापिता ब्रम्हाकुमारी आदी विविध अध्यात्मिक संस्थांतर्फे धार्मिक विधी आणि गुरूपूजन झाले. शाळा-महाविद्यालयांतही विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुरुपौर्णिमेनिमित्त वंदन केले.
गुरूपौर्णिमा आज असली तरी दोन दिवसांपासूनच सोशल मीडियावर शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरू होती. गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पोस्ट, व्हिडिओज शेअर होऊ लागले. काल रात्रीपासून, तर स्टेटस आणि डीपीही ‘गुरूमय’ झाले. सकाळपासून शाळा-महाविद्यालयांत सामूहिक गुरुपूजनावर भर दिला गेला. काही ठिकाणी व्याख्यानांचेही आयोजन झाले.
--------------
चौकट
जादा गाड्यांना प्रतिसाद
गुरुपौर्णिमेनिमित्त एसटी महामंडळाने नृसिंहवाडी, जोतिबा, अक्कलकोट, गाणगापूर, आदमापूर आदी ठिकाणी जादा गाड्यांचे नियोजन केले होते. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय खासगी वाहनानेही अनेकांनी या धार्मिक स्थळांना भेटी देऊन दर्शनावर भर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

LPG Gas Cylinder E-KYC: गॅस सिलिंडरची e-KYC केली का? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम; जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप माहिती

Nilanga Drought Crisis : आता जगायचं कसं ? मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो, CM फडणवीसांनी केलं असं काही..

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT