कोल्हापूर

सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग वाढताहेत

CD

सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग वाढताहेत
महिलाही आघाडीवर : गडहिंग्लज तालुक्यात २० उद्योग कार्यरत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : कृषी विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्‍या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत महिलांचा सहभाग वाढत असून त्यांच्याकडून छोटे उद्योग सुरु करण्याची संख्या वाढत आहे.
गडहिंग्लज तालुक्यात २० उद्योगांना मंजूरी मिळाली असून ते कार्यरतही झाले आहेत. या योजनेमुळे महिला स्वावलंबी बनण्यास मदत होत असून अधिकाधिक ग्रामीण महिलांनी त्याचा लाभ घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २८० हून अधिक असे सुक्ष्म अन्न प्रक्रियेचे उद्योग कार्यरत आहेत. १ ते ५० लाखापर्यंतच्या भागभांडवलाच्या उद्योगांना शासनाकडून ३५ टक्के किंवा १० लाखापर्यंतचे अनुदान देय आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील शेतकरी, उत्पादक गट, कंपनी, बचत गटातील महिलाही या योजनेचा लाभ घेत आहेत. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन प्रक्रिया मोफत केली जाते. योजनेतून आटाचक्की, शेवया मशिन, मिरची कांडप, दुग्धजन्य पदार्थ बनवणे, बेकरी उत्पादने, नाचणी, तांदूळ प्रक्रिया, फळांपासून वेगवेगळी उत्पादने, राईस मिल, पशुखाद्य निर्मिती, तेल घाणा, गुळ निर्मिती आदी उद्योग उभारणीची संधी आहे. योजनेच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या छोटे उद्योग उभारुन त्याद्वारे आर्थिक स्वावलंबी बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
----------
सक्षमता पाहून बँकेकडून अर्थसहाय्य
गडहिंग्लज तालुक्यातील लाभार्थीही यासाठी पुढे येत आहेत. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. आतापर्यंत तालुक्यात २० उद्योग कार्यरत झाले असून त्यामध्ये काजू प्रक्रिया, लाकडी घाण्यावर तेल काढणे, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती, बेकरी उत्पादनांचे उद्योग उभारले आहेत. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कृषी विभागाकडून त्याचा पाठपुरावा केला जातो. कागदपत्रे संकलीत करुन प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठवून मंजूरी घेतली जाते. त्यानंतर बँकेकडे हा प्रस्ताव पाठवला जातो. लाभार्थीची आर्थिक सक्षमता पाहून बँकेकडून अर्थसहाय्य केले जाते. त्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्तींचे सहकार्य मिळत असते. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यासाठी धन्वंतरी देसाई (कानडेवाडी) या संसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडील गेले, घरची जबाबदारी खांद्यावर आली; दिवसा बांधकामावर मजुरी अन् रात्री अभ्यास, अभिषेक बनला अधिकारी! पण यश बघायला बाप नसल्याने भावूक

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत भयानक पाऊस; २४ तासांत ५० गावांचा संपर्क तुटला

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

SCROLL FOR NEXT