कोल्हापूर

पालकमंत्री बदलाच्या चर्चेने कंत्राटदारांना ''धडकी''

CD

पालकमंत्री बदलाच्या चर्चेने कंत्राटदारांना''धडकी''
नियोजनच्या कामाची झाली ''उचल’; रक्‍कम बुडल्यास जबाबदार कोण?

सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ६ : जिल्‍ह्यात राष्‍ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची पालकमंत्री पदासाठी चर्चा सुरू आहे. यात विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे हे पद राहण्याची शक्यता मावळली आहे. असे झाले तर जिल्‍हा नियोजमधून निधी मिळवण्यासाठी काही ''स्‍वीय सहाय्‍यकां''वर केलेल्या गुंतवणुकीचे काय, असा प्रश्‍‍न पडला आहे, तर या निधीसाठी मध्यस्थी‍ करणारे काही क्‍लार्क व शासकीय अभियंते अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे.

जिल्‍ह्याच्या विकासासाठी जिल्‍हा नियोजन समितीकडून निधी दिला जातो. यात बांधकाम व खरेदीच्या कामांसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळते. जिल्‍ह्यातील सत्ता, नेत्याचे वजन, मंत्रिपद याचा विचार करून प्राधान्यक्रमाची कामे बाजूला ठेवून, रेटून हवी ती कामे केली जातात. गतवर्षात तर निधीचा मोठा सावळागोंधळ पाहायला मिळाला. मंजूर कामांचा निधी रद्द करून नवीन कामे करणे, कामात सतत बदल करणे, निधीत अतिक्रमण करणे, झालेल्या कामांना परत निधी लावणे याचबरोबर अनेकांनी टक्‍केवारी घेऊन विकलेला निधी हा विषय जिल्‍ह्यात चांगलाच चर्चेच्या केंद्रस्‍थानी राहिला.
जिल्‍हा नियोजनचा कारभार बदनाम होण्यात अनेक बड्या लोकप्रतिनिधींच्या पी.एं.चा हस्‍तक्षेप कारणीभूत ठरला असल्याची चर्चा आहे. काही नेत्यांना त्यांच्या पी.ए.च्या कारभाराची कल्‍पना नसली तरी, काहींची पी.ए.सोबत असलेल्या मिलीभगतबाबतही चर्चा रंगली आहे. वरिष्‍ठ नेत्याच्या या पी.एं.नी तर जिल्‍ह्यातील काही अधिकाऱ्यांच्या ॲण्‍टीचेंबरमधून निधीची विक्री केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जर जिल्‍ह्यात पदाधिकारी बदल झाला, तर या पी.एं.ना शोधण्याची वेळ कंत्राटदार व मध्यस्थींवर येणार असल्याचे चित्र आहे.

चौकट
पालकमंत्री कोण?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर पुण्याचे विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्‍हापूरच्या पालकमंत्री पदाची संधी मिळू शकते. यात काही बदल झाला, तर मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्‍ह्याचे पालकमंत्री होतील. मात्र, दीपक केसरकर यांच्याकडे पालकमंत्री पद राहणार नाही, असे राष्‍ट्रवादीतून सांगण्यात येत आहे. असे झाले तर शिंदे गटाचे नियोजन मंडळातील महत्त्‍वही कमी होणार आहे.

कोट
जिल्‍हा नियोजन मंडळाकडे अनेक विकासकामांच्या याद्या दिल्या. मात्र, आमची कामे बाजूला सारून काही ज्येष्‍ठ नेत्यांची कामे मंजूर करण्यात आली. अशाप्रकारे भेदभाव करून सर्वसामान्य जनतेवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे नियोजन मंडळाच्या कामात बदल होणे आवश्यक आहे. निवडक लोकांचा नव्‍हे, तर सर्वसामान्य लोकांचा विकास अपेक्षित आहे.
-ॲड. हेमंत कोलेकर,
माजी जि. प. सदस्य, भाजप तालुकाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT