कोल्हापूर

फॅशन डिझायनिंग शिबिरात ३५० महिलांचा सहभाग

CD

ich65.jpg
14403
इचलकरंजी ः ताराराणी पक्षाच्या महिला आघाडीतर्फे आयोजित फॅशन डिझायनिंग शिबीराचे उद्‌घाटन वैशाली आवाडे यांच्याहस्ते झाले.

फॅशन डिझायनिंग शिबिरात ३५० महिलांचा सहभाग
इचलकरंजी, ता. ६ ः ताराराणी पक्ष महिला आघाडीतर्फे घेतलेल्या फॅशन डिझायनिंग शिबीराला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.
शिबीरात शहर व परिसरातील तब्बल ३५० महिलांनी सहभाग नोंदवला. शिबीराच्या माध्यमातून महिलांना विविध प्रकारच्या फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण दिले. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला.
महिलांच्या कलागुणांना वाव देऊन त्याचे अर्थार्जनात रुपांतर करुन त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने तीन दिवसीय शिबीराचे आयोजन केले होते. श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे झालेल्या या शिबीराचे उद्‌घाटन महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे यांनी केले. कार्याध्यक्षा नजमा शेख, राजश्री आडगाणे, सचिव डॉ. रजनी शिंदे, सीमा कमते, शोभा घाडगे, अंजुम मुल्ला आदी उपस्थीत होते. प्रास्ताविक आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड यांनी केले. आभार उपाध्यक्षा जयश्री शेलार यांनी मानले. शिबीरात विविध फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण शितल धस्के, सिध्दी धस्के व सन्मती मडके यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT