कोल्हापूर

‘संजय गांधी’ अनुदानात वाढ

CD

‘संजय गांधी’ अनुदानात वाढ
इचलकरंजी, ता. ६ ः संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत सर्वच लाभार्थ्यांच्या अनुदानात केलेल्या ५०० रुपये वाढ संदर्भातील अध्यादेश राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आता १ हजार रुपये ऐवजी दरमहा १५०० रुपये अनुदान मिळणार आहे. याबाबत आमदार प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा केला होता.
राज्य शासनाने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्य १ हजारवरून १५०० रुपये करण्याचा म्हणजेच अनुदानात ५०० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती. २८ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता दिली होती. त्यानुसार ५ जुलै रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत सर्वच लाभार्थ्यांचे अनुदान १ हजारवरून १५०० रुपये करण्यात येत असल्याचा अध्यादेश कार्यासन अधिकारी प्रशांत पुं. वाघ यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway In Maharashtra : साताऱ्याच्या दुष्काळी मातीला येणार सोन्याचे दिवस! 'या' 3 तालुक्यांचा चेहरामोहरा बदलणार; जाणून घ्या काय आहे मेगा प्लॅन?

Government Job: SSC CGL 2026 नोटिफिकेशन जारी! 12,256 जागांसाठी मेगाभरती; जाणून घ्या परीक्षा तारखा ते अर्ज प्रक्रिया एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात दऱ्याचे वडगाव ग्रामस्थांचा करवीर पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा

Daund Manmad Railway: दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरणाचा फटका; सोलापूर विभागातील गाड्या तासन्तास उशिराने, सोलापूर विभागातील रेल्वे वेळापत्रक कोलमडले

Raigad: रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग दोन दिवस बंद राहणार, प्रशासनाचा मोठा निर्णय, कधी आणि का?

SCROLL FOR NEXT