कोल्हापूर

ट्रॅफिक पोलिस निरीक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर

CD

वाहतुकीला शिस्त लावण्याचे आव्हान
वाहतूक शाखेच्या निरीक्षकांवर अपेक्षांचा बोजा; समन्वयाने निर्णय झाल्यास योग्य परिणाम शक्य

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर,ता. ७ ः रंकाळा टॉवर, कोळेकर तिकटी, शाहूपुरी गवत मंडईतील वाहतूक कोंडीचे पहिले आव्हान आहे. तसेच गटाने उभे राहणे, मोबाईलवर बोलत थांबणे, वाहतुकदाराशी मर्यादेत राहून बोलणे यासाठी पोलिसांना शिस्त लावण्याचे दुसरे आव्हान शहर वाहतूक शाखेच्या नुतन पोलिस निरीक्षकांसमोर आहे. सहा महिने प्रभारीवर चाललेल्या शाखेला आता नव्याने कायमस्वरुपी निरीक्षक मिळाले आहेत. त्यामुळे नुतन निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासमोर वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच कार्यालयाला शिस्त लावण्याचे आव्हान आहे.
रस्त्याकडेला पांढरे पट्टे नाहीत, सिग्नल सुरू नाहीत, रोज वाहनांच्या संख्येत भर पडत आहे, रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. बॉटल नेक असलेल्या रस्त्यावर दुचाकी-चारचाकी पार्किंगला बंदी घालणे, अरुंद व रहदारीच्या रस्त्यावरील पार्किंग आणि फेरीवाल्याचे अतिक्रमण काढणे, आवश्‍यक त्या ठिकाणी पांढरे पट्टे मारणे अशा अनेक कांमाना आता नव्या निरीक्षकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. काही मुद्दे शहर वाहतूक शाखेकडील आहेत तर काही मुद्दे महापालिकेच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे संयुक्त प्रयत्नातून हे प्रश्‍न निकाली निघणे शक्य आहे.
यापूर्वी आर.आर.पाटील, वसंत बाबर, अशोक धुमाळ यांनी केलेले आराखडे पोलिस अधीक्षकांनाही सादर केले आहेत. त्याचा उपयोग केल्यास काही अंशी वाहतूक कोंडीवर उतारा मिळू शकतो. वाहतूकदार, स्थानिक नागरीकांना विश्‍वासात घेवून वाहतुकीला शिस्त लावणे आवश्‍यक ठरणार आहे.

चौकट
हे तातडीने शक्य...
० रंकाळा टॉवर येथील दुचाकी पार्किंग बंद करून तेथे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या तळघरात पार्किंगची व्यवस्था करणे
० सीपीआर चौकातील बसथांबा, फेरीवाले यांना शिस्त लावून तेथील वाहतूक कोंडी कमी करणे
० उमा चौक ते राजारामपुरी जनता बझार या मार्गावरील रस्त्याकडील पांढऱ्या पट्ट्याच्या आताच पार्किंग ठेवण्यासाठी प्रयत्न करणे
० कोळेकर तिकटी येथे सकाळी आणि सायंकाळी वाहतूक शाखेचे पोलिस नेमणे
० शहरातील सर्व सिग्नल सकाळी आणि सायंकाळी सुरू ठेवणे
० तिब्बल सीट रोखण्यासाठी विशेष मोहीम घेणे

चौकट
इचलकरंजीत वाहतूक केली सुरळित
नुतन पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे हे मुळचे कोल्हापूरचे कणेरीतील आहेत. त्यांनी यापूर्वी नागपूरपासून इचलकरंजीपर्यंत ठिकठिकाणी सेवा बजावली आहे. इचलकरंजीत त्यांनी वाहतूक शाखेत राहून शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम केले आहे. आता त्यांच्या समोर कोल्हापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT