कोल्हापूर

पाँलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया

CD

पाँलिटेक्निकसाठी यंदाही तीन फेऱ्या
प्रवेशप्रक्रिया; १७ जुलैला गुणवत्ता यादी, २८ जुलैला पहिला यादी
सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. ८ : पदविका आभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी यंदाही तीन फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. अर्ज भऱण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. शनिवार (ता. १५) अखेर अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. सतरा जुलैला कच्ची तर २१ जुलैला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होईल. अठ्ठावीस जुलैला प्रवेश मिळालेल्यांची पहिली यादी लागेल.
तंत्रशिक्षण संचालनालय़ातर्फे पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशप्रकिया एक जूनपासून सुरु आहे. विद्यार्थ्यांना http://poly२३.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. विविध दाखले मिळण्यात अडचणी असल्याने पालकांच्या मागणीमुळे अर्ज भरण्यासाठी तीन वेळा मुदत वाढविण्यात आली. नव्या वेळापत्रकानुसार शनिवारअखेर अर्ज करण्याची मुदत आहे. सतरा जुलैला कच्ची गुणवत्ता यादी जाहीर होईल. यावर १९ जुलैअखेर हरकती नोंदविता येतील. एकवीस जुलैला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होईल.
राज्यात आजअखेर सुमारे १ लाख ४० हजार प्रवेश अर्ज भऱले गेले आहेत. पक्की गुणवत्ता यादी प्रसिध्द झाल्यानंतर विविध अभ्यासक्रम आणि तंत्रनिकेतन निवडण्यासाठी विकल्प देण्याच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी २८ जुलैला लागणार आहे. यंदाही प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहेत. त्यानंतरही जागा रिक्त राहिल्यास संस्था स्तरावर शेवटची फेरी होईल. १७ ऑगस्टपासून शैक्षणिक कामकाजाला प्रारंभ होईल. अकरावीची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने पालकांना पॉलिटेक्निकच्या प्रवेशाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

चौकट..
प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
फेरी कालावधी
पहिली विकल्प फेरी २३ ते २६ जुलै
पहिली यादी २८ जुलै
दुसरी विकल्प फेरी ६ ते ८ ऑगस्ट
दुसरी यादी १० ऑगस्ट
तिसरी विकल्प फेरी १९ ते २२ ऑगस्ट
तिसरी यादी २४ ऑगस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT