कोल्हापूर

गोकुळ चौकशी

CD

`गोकुळ’ वरील कारवाईबाबत उत्सुकता

समीकरणे बदलली ः उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ८ ः शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर लावण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावरील (गोकुळ) चौकशीच्या कारवाईबाबत जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे. ‘गोकुळ’ च्या सत्ताधारी गटाचे नेतृत्त्व करणाऱ्यांपैकी आमदार हसन मुश्रीफ यांची कॅबिनेट मंत्रीपदावर नियुक्ती झाल्याने सत्ताधारी गटाला बळ मिळाले आहे, पण त्याचवेळी न्यायालयात दाखल याचिकेवरील आदेशाचीही प्रतीक्षा आहे.
‘गोकुळ’ वर सुमारे २८ वर्षांहून अधिक काळ आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व होते. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ‘गोकुळ’ च्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, मुश्रीफ, आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासह महाडिक विरोधकांनी एकत्र येऊन सत्तांतर घडवले. त्यावेळी महाविकास आघाडी सत्तेत होती आणि त्यात सतेज यांच्यासह मुश्रीफ मंत्री होते. या जोरावर त्यांनी हा करिष्मा दाखवला.
प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र अशी ‘गोकुळ’ ची ओळख आहे. या जोरावर महाडिक यांनी जिल्ह्याच्या राजकारणाचे नेतृत्व केले. महाडिक यांच्या या सत्तेलाच सुरूंग लावल्याने त्यांच्यासह त्यांना मानणारा गट ‘बॅकफूट’ वर गेला आहे. पण गेल्यावर्षी राज्यात शिवसेनेतच बंड झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या ४० आमदारांसह भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचे पडसाद म्हणून महाडिक यांचे पुतणे खासदार धनंजय महाडिक यांनी आपली ताकद वापरून ‘गोकुळ’ च्या चाचणी लेखा परीक्षणाचे आदेश काढले. गेले वर्षभर ही चौकशी सुरू आहे, त्याविरोधात उच्च न्यायालयात सत्ताधाऱ्यांनी आव्हान दिले, पण न्यायालयानेच चौकशी अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. मध्यंतरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही ‘गोकुळ’ च्या कारभारात अनियमितता असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे ‘गोकुळ’ वर कारवाई होईल असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच बंडखोरी झाली आणि त्यातून ‘गोकुळ’ च्या सत्ताधारी गटाचे नेतृत्त्व करणारे मुश्रीफ मंत्री झाले. आता उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर काय आदेश येतात, यावर कारवाई अवलंबून आहे.
..........

मुश्रीफांकडे दुग्ध विकास खाते ?

नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन आठवडा उलटला असला तरी नव्या मंत्र्यांना खातेवाटप झालेले नाही. सोमवारनंतर (ता. १०) खाते वाटप शक्य असून मुश्रीफ यांच्याकडे दुग्ध विकास व कामगार मंत्रीपदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्याचा परिणाम ‘गोकुळ’ च्या एकूणच चौकशी व कारवाई होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

SCROLL FOR NEXT