कोल्हापूर

शौर्य, अर्णव, अरिना,अंशुमन,शंतनू व महिमा आघाडीवर

CD

१४८६६
कोल्हापूर : भाजपचे शहराध्यक्ष राहुल चिकोडे व उद्योजक मनीष झंवर यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले.

शौर्य, अर्णव, अंशुमन,शंतनू,
अरिनासह महिमा आघाडीवर
कोल्हापूर, ता. ८ : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने अनयाज चेस क्लब आयोजित केलेल्या ९, १२ व १५ वर्षाखालील शालेय मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्‍घाटन भाजपचे शहराध्यक्ष राहुल चिकोडे व उद्योजक मनीष झंवर यांचे हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले.
या वेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे, ऍड. प्रिया पवार, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले,धीरज वैद्य, प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे व स्पर्धा संयोजक मनीष मारुलकर उपस्थित होते.
स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण सहा फेऱ्यात होणार आहेत. आज झालेल्या तिसऱ्या फेरीनंतर नऊ वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित शौर्य बगाडिया, द्वितीय मानांकित अर्णव पाटील, आदित्य ठाकूर व रौनक झंवर हे चौघेजण तीन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. बारा वर्षाखालील मुलांच्या गटात, अग्रमानांकित अरिना मोदी व अंशुमन शेवडे तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित शंतनू पाटील, व्यंकटेश खाडे पाटील, महिमा शिर्के व अरीन कुलकर्णी हे चौघेजण तीन गुणांसाठी संयुक्तपणे आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT