कोल्हापूर

सीपीआर वृत्त

CD

वारा, डासांचा उपद्रव कायम!
सीपीआर परिसर; शेड बंदिस्त करण्याकडे दुर्लक्ष
कोल्हापूर, ता. ८ : पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत आह. वारा, डासांचा उपद्रव सोसत सीपीआर आवारात रूग्णांच्या नातेवाईकांना उघड्यावर विश्रांती घेण्याची वेळ येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप येथील शेड बंदिस्त करण्यासाठी कोणतीच उपाय योजना न केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे.
जवळपास ५०० बेडच्या रूग्णालयात रोज ३५० वर रूग्ण येथे ॲडमीट असतात. प्रसुती विभाग, बालरूग्ण तसेच पुरूष शल्य चिकित्सा, आयसीयु विभागात सर्वाधिक रूग्ण असतात. रूग्णासोबत एक, रूग्णालयाच्या बाहेर एक, असे एका रूग्णासोबत किमान ते दोन ते तीन नातेवाईकांना सीपीआर आवारात थांबवे लागते. कधी आई ॲडमीट आहे म्हणून मुले बाहेर थांबतात, तर कधी पत्नी ॲडमीट आहे म्हणून पती व मुलांना बाहेर थांबावे लागते. अशा नातेवाईकांसाठी येथे पत्र्याचे तात्पुर्ते शेड जरूर आहेत, मात्र त्याला भिंती नाहीत किंवा पडदेही लावलेले नाहीत. अशात पावसाचे पाणी आत येते, अवती भोवती डास घोंगावतात. असा रात्रभर त्रास सोसतच नातेवाईकांना येथे झोपण्याएवजी जागे राहून थांबावे लागते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे शेड बंदिस्त करावे, डागडुजी करावी, असे पत्र सीपीआर वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले आहे, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही नसल्याने रूग्णाच्या नातेवाईकांनी हा त्रास सोसावे लागत आहे.
----------------
चौकट
मोकाट कुत्र्यांचा वावर
अनेक नातेवाईक अशा मोकळ्या जागेत बसून जेवण करतात. खरकटे अन्न तेथे पडते. त्यामुळे मोकाट कुत्री येतात. रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री अनेकदा नातेवाईकांनाच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे सीपीआर आवारात रात्रीच्या वेळी जीवमुठीत घेवून वावरावे लागते, असे अनुभवही नातेवाईकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT