कोल्हापूर

शिवसेना ठाकरे पक्ष - मंगळवारी मुंबईत बैठक

CD

शिवसेना ठाकरे गटाची
मंगळवारी मुंबईत बैठक

कोल्हापूर, ता. ८ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकसभेचे उमेदवार कोण याची चाचपणी मंगळवारी (ता. ११) मुंबईतील बैठकीत होणार आहे. लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडीच्या पार्श्‍वभूमीवर मंबईत बैठक होणार आहे. यासाठी पदाधिकाऱ्यांचा अंदाज घेवून तो अहवाल संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर देणार आहेत.
कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र फुटीच्या राजकरणात त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार देण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे. त्याची चाचपणी आज झालेल्या मेळाव्यातून सुद्धा झाली आहे.
मंगळवारी मुंबईत बैठक झाल्यानंतर साधारण १५ ते २७ जुलै दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पावसाळा असल्यामुळे एका मोठ्या हॉलमध्ये त्यांची सभा होणार असल्याचे सुतोवाच आज दुधवडकर यांनी केले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या मतदारसंघात पक्षाचे उमेदवार देण्याची तयारी आता पक्षांतर्गत सुरू झाली आहे. यासर्व विषयांची चर्चा आता मंगळवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत शक्य आहे.
दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्यावर टीका झाली आहे, या पत्रकारांच्या प्रश्‍नावर दुधवडकर म्हणाले, ‘कोणी सेटेलमेंट करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची गय केली जाणार नाही. पक्षातील ज्यांना काही तक्रारी करायच्या आहेत त्यांनी त्या पक्षश्रेष्ठींकडे कारव्यात. जिल्ह्यातील काही मुद्दे आमच्या कानावर आले आहेत, त्याची दखल पक्षप्रमुख घेतील.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT