कोल्हापूर

इचल : टुडे पानएकसाठी

CD

...

वस्त्रनगरीचे आरोग्य डेंजर झोनमध्ये

डेंगीसदृश्य रुग्णांची संख्या वाढली ः महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना सुरु

इचलकरंजी, ता.१० ः शहरातील विविध भागात डेंगीसदृश्य रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तक्रार येणाऱ्या परिसरात औषध व धूर फवारणीवर भर दिला जात आहे. पावसाळा सुरु झाला असला तरी ऊन - पावसाचा खेळ सुरु असल्यामुळे साचलेल्या पाण्यातून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शहरात डेंगीसदृश्य रुग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून कचरा उठाव करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक भागात कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. त्यातच पाऊस पडल्यानंतर दलदल निर्माण होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे डासांचा प्रादुर्भाव सर्वच भागात वाढला आहे. दिवसभरात पावसाच्या दोन-चार सरी येतात. त्यानंतर कडक ऊन पडत आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होत आहे. परिणामी, डास चावल्यामुळे डेंगीसदृश्य रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष करुन तापाचे रुग्ण वाढत असून खासगी दवाखान्यांत गर्दी होताना दिसत आहे.
दुसरीकडे मनपा आरोग्य विभागाने मात्र अधिकृत कोठेही डेंगीचा रुग्ण आढळला नसल्याचा दावा केला आहे. संसर्गजन्य तापामुळे रुग्ण बाधित होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तरीही खरबदारी म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरु केल्या आहेत. कचरा उठाव वेळेवर करण्यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या शिवाय ज्या परिसरातून डेंगीसदृश्य रुग्ण आढळून येत असलेल्या परिसरात उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये औषध फवारणीसह फॉगिंग मशिनव्दारे धूर फवारणी करण्यात येत आहे.
------

दररोज दोन संशयित रुग्ण दाखल

इचलकरंजीसह परिसरातही डेंगीचा विळखा वाढत असल्याचे समोर येत आहे. शासनाच्या आयजीएम रुग्णालयात डेंगीचे दररोज दोन संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याची माहिती देण्यात आली. ‘आयजीएम’ मधून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जुलै या कालावधीत तब्बल ४१ डेंगीबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच कालावधीत खासगी रुग्णालयात ४२ रुग्णांनी उपचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांत डेंगी रुग्णांमध्ये वाढ होत आहे.


....
‘डेंगीचा संभाव्य प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. औषध व धूर फवारणी करण्यासह कचरा उठाव वेळेवर होण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
डॉ. सुनिलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महापालिका
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT