कोल्हापूर

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग खुला

CD

‘शासकीय अभियांत्रिकी’तील
प्रवेशाचा मार्ग खुला

पाच अभ्यासक्रमांना तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता; सांकेतिक क्रमांक मिळाला


कोल्हापूर, ता. १० ः नवी दिल्लीतील तंत्रशिक्षण परिषद आणि मुंबईमधील तंत्रशिक्षण संचालनालयाने कोल्हापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच अभ्यासक्रमांना मान्यता आणि स्वतंत्र सांकेतिक क्रमांक (कोड नंबर) उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेतील अर्ज भरण्याचा विद्यार्थ्यांचा मार्ग खुला झाला आहे.
या महाविद्यालयाला क्षेत्रीयस्तरावर ६०३६ असा संस्था क्रमांक मिळाला आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (६०३६२६३१०), कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (६०३६२४२१०), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (६०३६३७२१०), मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग(६०३६६१५१०), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग(६०३६२९३१०) या अभ्यासक्रमांना सांकेतिक क्रमांक मिळाला आहे. या प्रत्येक अभ्यासक्रमांना ६० याप्रमाणे एकूण ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे या विद्यापीठाशी हे महाविद्यालय संलग्नित असणार आहे. महाविद्यालयाबाबतच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. दत्तात्रय गर्गे यांनी दिली.
....

ऑगस्टमध्ये भरणार वर्ग

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या महाविद्यालयाला मंजुरी आणि निधी मिळवून दिला आहे. त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार महाविद्यालय प्रारंभाचे काम सुरू आहे ऑगस्टमध्ये अभियांत्रिकीच्या प्रथम सत्राच्या तासिका आणि प्रात्यक्षिके या शैक्षणिक कामकाजास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात होणार आहे. प्रथम वर्ष प्रवेशाच्या अनुषंगाने अधिक माहितीसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यानगर येथे इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. गर्गे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : लाकडाच्या मागणीत 50 टक्के वाढ

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT