कोल्हापूर

राज्याची शालेय शिक्षणात घसरण

CD

शालेय गुणवत्तेत राज्यात कोल्हापूर तिसरे
‘पीजीआय’ अहवाल जाहीर; सातारा अव्वल; राज्याची मात्र तिसऱ्या श्रेणीत घसरण

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने कामगिरी वर्गवारी निर्देशांक (परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स २.० (पीजीआय) अहवाल जाहीर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या श्रेणीवरून तिसऱ्या श्रेणीवर घसरले आहे. राज्याला एक हजारपैकी ५८३.२ गुण मिळाले आहेत. राज्यात शाळांची गुणवत्ता आणि श्रेणीमध्ये सातारा जिल्हा ६०० पैकी ४३० गुणांसह अव्वलस्थानी आहे. त्यापाठोपाठ ४२४ गुणांसह मुंबई (विभाग-२) दुसऱ्या, तर ४२२ गुणांसह कोल्हापूर आणि नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने शालेय शैक्षणिक व्यवस्थेची कामगिरीनिहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा सन २०२०-२०२१ आणि २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांचा एकत्रित अहवाल जाहीर केला आहे. अहवालात जिल्हास्तरावरील शालेय शिक्षण व्यवस्थेच्या सर्वंकष विश्लेषणासाठी निर्देशांक तयार करून या शिक्षण व्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यांकन केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राला एक हजार गुणांपैकी ५८३.२ गुण मिळाले आहेत. त्यामुळे राज्याचा प्रचेस्ट-३ या श्रेणीमध्ये समावेश झाला आहे. अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्तेशी संबंधित असलेल्या गटात राज्याला २४० पैकी अवघे ६४.८ गुण मिळाल्याने आकांक्षी-१ अशी श्रेणी मिळाली आहे. पायाभूत सुविधांच्या गटामध्ये १९० पैकी ७३.४ गुण मिळाल्याने प्रचेस्ट-३ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्या श्रेणीमध्ये दिल्ली, गुजरात, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळ यांचाही समावेश आहे.

शिक्षक शिक्षणात राज्याला अतिउत्तम श्रेणी
या मूल्यांकनामधील शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षण या गटात १०० पैकी ७३.६ गुणांची कमाई करत महाराष्ट्राने अतिउत्तम श्रेणी मिळविली आहे. शिक्षण समानता गटात २६० पैकी २३३.४ आणि शिक्षणाची उपलब्धता गटामध्ये ८० पैकी ६४.७ गुणांसह उत्कर्ष श्रेणी प्राप्त केली आहे. या गटांमध्ये राज्याची कामगिरी उत्कृष्ट झाली असल्याचे दिसून आले.

‘पीजीआय’मधील महाराष्ट्राची गेल्या चार वर्षांतील गुण (१००० पैकी)
वर्ष* गुण
२०१७-१८*७००
२०१८-१९*८०२
२०१९-२०*८६९
२०२०-२०२१*९२८
...........................................................................................
जगातील सर्वात मोठी शिक्षण व्यवस्था
सुमारे १४ लाख ९० हजार शाळा, ९५ लाख शिक्षक आणि विविध विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेले सुमारे २६ कोटी ५० लाख विद्यार्थी यांना सामावून घेतलेली भारतीय शिक्षण व्यवस्था ही जगातील सर्वात मोठ्या शिक्षण व्यवस्थांपैकी एक आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने राज्यांसाठी शिक्षण व्यवस्थेचा पीजीआय अहवाल जाहीर केला. शालेय शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी नेमक्या कुठल्या क्षेत्रात बदल घडवून आणणे आवश्यक आहे. ते प्राधान्य क्रमाने ठरवून सुधारणेची अधिकाधिक चांगली श्रेणी प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यांना मदत करणे हे पीजीआय-डीचे उद्दिष्ट आहे.

असे झाले मूल्यांकन....
या पीजीआय-डीच्या संरचनेत विविध प्रकारच्या मूल्यांकनासाठी ८३ निर्देशक ठरवण्यात आले. त्यांचे एकूण मूल्यमापन ६०० गुणांमध्ये केले. या ८३ निर्देशकांची मिळालेले एकंदर परिणाम, वर्गातील अध्यापनाची परिणामकारकता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण, डिजिटल अध्ययन आणि प्रशासन प्रक्रिया या सहा गटांमध्ये विभागणी केली. ते गट १२ भागांमध्ये विभागले. पीजीआय-डीने जिल्ह्यांसाठी दहा श्रेणी निश्चित केल्या आहेत. या मूल्यांकनामध्ये गुणांवर आधारित श्रेणी ठरविण्यात आली. त्यात ९४१ ते १००० गुणांसाठी दक्ष, ८८१ ते ९४० गुणांसाठी उत्कर्ष, ८२१ ते ८८० गुणांसाठी अति उत्तम, ६७१ ते ८२० गुणांसाठी उत्तम, ७०१ ते ७६० गुणांसाठी प्रचेस्ट १, ६४१ ते ७०० गुणांसाठी प्रचेस्ट २, तर ५८१ ते ६४० गुणांसाठी प्रचेस्ट ३ तसेच ४६० ते ५२१ या गुणांसाठी आकांक्षी श्रेणी दिली आहे.

कोल्हापूर ‘अतिउत्तम’
शाळांची गुणवत्ता आणि श्रेणीमध्ये राज्यात कोल्हापूर जिल्हा ‘टॉप-थ्री’मध्ये आहे. जिल्ह्याची कामगिरी चांगली आहे. दोन वर्षांपूर्वी या मूल्यांकनात कोल्हापूरला ३५१ गुणांसह प्रचेस्ट श्रेणी मिळाली होती. यावर्षी ४२२ गुणांसह अतिउत्तम श्रेणी मिळाली आहे. यापुढे कोल्हापूरचा या अहवालातील स्थान वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT