कोल्हापूर

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये वर्षभरात साकारणार आयओटी, ड्रोन लॅब

CD

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये वर्षभरात
साकारणार आयओटी, ड्रोन लॅब

अद्ययावत संशोधन होणार; अभियांत्रिकी महाविद्यालयांना सहभागाची संधी


कोल्हापूर, ता. ११ ः केंद्र आणि राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स (उत्कृष्टता केंद्र) स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी ४ कोटी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या सेंटरअंतर्गत तंत्रनिकेतनमध्ये आयओटी, ड्रोन आणि इंजिनिअरींग सिम्युलेशन लॅबची वर्षभरात उभारणी केली जाईल, अशी माहिती प्राचार्य डॉ. दत्तात्रय गर्गे आणि उपप्राचार्य डॉ. रणजित सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
औद्योगिक, उद्योग क्षेत्रामध्ये सद्यस्थितीतील तंत्रज्ञानाव्यतिरिक्त अत्युच्चम तंत्रज्ञान विकसित करून उद्योग, व्यवसाय, कुशल तंत्रज्ञ यांच्या वाढीसाठी राज्यात दहा ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ५३ कोटी ६६ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष अभ्यास गटाच्या माध्यमातून उद्योजक, तंत्रव्यवसाय, व्यावसायिकांशी समन्वय साधून या सेंटरच्या स्थापनेच्या निर्णयात योगदान दिले असल्याचे डॉ. गर्गे यांनी सांगितले. शासकीय तंत्रनिकेतनमधील या सेंटरमध्ये डिजिटायझेशन थ्रू सिम्युलेशन, आयओटी, इंजिनिअरिंग सिम्युलेशन आणि ड्रोन याबाबत संशोधन केले जाणार आहे. त्यासाठी वर्षभरात स्वतंत्र लॅबची उभारणी केली जाणार आहे. उद्योग, व्यवसायासाठी नवतंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी संशोधन केले जाईल. दरवर्षी तीन ते चार विद्यार्थ्यांना रिसर्च स्कॉलर म्हणून दरमहा पाठ्यवेतन दिले जाणार आहे. या सेंटरमध्ये शासकीय अभियांत्रिकी आणि इतर महाविद्यालयांना सहभागी होण्याची संधी दिली जाणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. यावेळी प्रा. मारुती पाटील, डॉ. विजय गंगापुरे, प्रा. पांडुरंग तरंगे, निदेशक दत्ता सुतार उपस्थित होते.
...

प्रवेशासाठी नोंदणीचा टक्का वाढला

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी शासकीय तंत्रनिकेतनमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या नोंदणीचा टक्का सरासरी ८ टक्क्यांनी वाढला असल्याचे डॉ. गर्गे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT