कोल्हापूर

सांगवडेवाडी शेतीचे अज्ञाताकडून नुकसान

CD

15555
...

सांगवडेवाडीत उभ्या
पिकाचे वीस लाखांचे नुकसान

दिनकर चव्हाण यांच्या मालकीच्या शेतीत अज्ञाताचे कृत्य

सांगवडेवाडी, ता. ११ ः येथील शेतकरी अप्पासाहेब, राजेंद्र व बाबासाहेब दिनकर चव्हाण यांच्या मालकीच्या शेतीतील उभ्या पिकाचे काल अज्ञातांनी नुकसान केले. टोमॅटो, मिरची, कारलीच्या पिकाचे वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान झाल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले.
दिनकर चव्हाण आणि त्यांच्या तीनही मुलांसह घरातील सदस्यांनी कष्टातून पीक आणले. त्यामध्ये टोमॅटो अर्धा एकर, मिरची व कारली प्रत्येकी १० गुंठे इतके असून हातातोंडाशी आलेले पिक अज्ञातांनी उखडून टाकले आहे. येत्या चार-आठ दिवसात टोमॅटो विक्रीसाठी उपलब्ध होणार होते. आज टोमॅटोचा बाजारपेठेतील दर शंभर ते सव्वाशे रूपये असून पंधरा ते वीस टन टोमॅटोचे उत्पादन अपेक्षित धरता वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान झाल्याचे अप्पासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, शेतीचे नुकसान झाल्याचे समजतात गावातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. चव्हाण कुटुंबीयांच्या घरातील महिलांनी नुकसान पाहून अक्षरशः आक्रोश केला. चव्हाण यांच्याबरोबरच बाबगोंडा पाटील व संजय खोत यांच्या मालकीच्या पंधरा गुंठे क्षेत्रातील वरण्याचे पिकही अज्ञातांनी उखडून टाकले आहे. या प्रकाराची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास चालू आहे.
सध्या भाजीपाल्याला चांगला दर मिळत असल्याने अशा प्रकारे नुकसान होऊ लागल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. चव्हाण बंधूंनी शेतीच्या उत्पन्नावरच अलिकडे घराचे बांधकाम सुरू केले आहे. आता या नुकसानीमुळे हे कुटुंब उघड्यावर पडले आहे.
...

आमदार ऋतूराज पाटील
यांच्याकडून शेतकऱ्यांना मदत

सांगवडेवाडी येथील घटनेची माहिती समजताच आमदार ऋतुराज पाटील यांनी या शेतकऱ्यांची तत्काळ भेट घेऊन त्यांना आधार देत आर्थिक मदत दिली. शेताची झालेली ही नासधूस संवेदनशील माणसांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या बाबतीत घडलेली ही घटना धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी शितल खोत, रामदास माने, धनराज खुडे, सुदर्शन खोचगे, रवी खोत, राजेंद्र चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT