कोल्हापूर

कळंबा फिल्टर हाऊस स्वच्छता

CD

16577

कळंबा जलशुद्धीकरण केंद्रात
गाळ काढण्याचे काम सुरू

कोल्हापूर, ता. १६ ः कळंबा तलावातील पाणी पातळी कमी झाल्याने महापालिकेच्या कळंबा जलशुद्धीकरण केंद्राचे कामही बंद झाले आहे. अजून तलावातील पातळी वाढली नसल्याने केंद्रातील गाळ काढण्याचे काम केले जात आहे.
कळंबा तलावातून सायफन पद्धतीने कळंबा जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येते. त्याच्या शुद्धीकरणासाठी १९४६ मध्ये बांधलेल्या या केंद्रात दोन वेगवेगळे सेटलिंग टॅंक आहेत. त्या टॅंकमधून गाळ कमी झालेल्या पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. कळंबा तलावातील पाणी आटल्याने सायफन पद्धतीने येणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे हे केंद्र बंद आहे. महापालिकेने त्या केंद्रातील सेटलिंग टॅंकमधील गाळ काढण्याबरोबरच इतर देखभालीची कामे सुरू केली आहेत. सेटलिंग टॅंकमध्ये साठलेला मोठ्या प्रमाणावरील गाळ तसेच गाळाचा निचरा होण्यासाठी असलेल्या यंत्रणेत अडकलेला कचरा काढण्याचे काम केले आहे. दोन टॅंकमधील बहुतांश काम पूर्ण झाली आहेत. तलावातील पाणी वाढले की आपोआप या केंद्रात पाणी येऊन शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाणार आहे.
या केंद्रामध्ये तलावातील पाण्याबरोबर गाळही मोठ्या प्रमाणावर येत असतो. त्यामुळे हा गाळ वाहून जाण्यासाठी सातत्याने वॉश आऊट घ्यावा लागतो. त्यातून बरेच पाणी रस्त्यावरून वाहून जाण्याचा प्रकार होत होता. तो रोखण्यासाठी आता वॉश आऊटचे पाणी साठवण्यासाठी एक टाकी बांधली आहे. त्यातून पाणी उपसून वापरण्यात येणार असल्याने पाण्याचा अपव्यय होणार नाही. लवकरच ही टाकीही सुरू केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT