कोल्हापूर

आजरा ः मडिलगे कार्यक्रम बातमी

CD

मडिलगेत सरस्वती वाचनालयात वाचन दिन
आजरा ः मडिलगे (ता. आजरा) येथील सरस्वती वाचनालय व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने वाचन दिवस झाला. संस्कृती मंत्रालय भारत सरकार व राजाराममोहन राॅय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता यांच्यावतीने केरळ राज्यातील ग्रंथालय व साक्षरता चळवळीचे जनक पी. एन. पणिकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचन दिवस होतो. वाचनालयाचे अध्यक्ष जनार्दन नेऊंगरे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात वाचनालयाविषय़ी माहिती दिली. नेऊंगरे म्हणाले, ‘तालुक्यातील दोन नंबरचे वाचनालय असून २५ हजार ग्रंथसंपदा आहे. याचा लाभ घ्यावा.’ डाॅ. मारुती डेळेकर यांचा सत्कार माजी सरपंच के. व्ही. येसणे यांच्या हस्ते झाला. डाॅ. डेळेकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी झालेल्या चित्ररंग भरण, वक्कृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार झाला. विनायक वाजेकर, माजी सभापती भिकाजी गुरव, के. व्ही. येसणे यांची भाषणे झाली. यावेळी सरपंच बापू निऊंगरे, उपसरपंच सुशांत गुरव, संभाजी जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालंदर येसणे, वाचनालयाचे उपाध्यक्ष विजय परुळेकर, कार्यवाह महादेव पाटील, खजिनदार राजेंद्र कुंभार, सदस्य रघुनाथ येसणे, आनंदा कडगावकर, दत्तात्रय देसाई, जनार्दन पाटील, गणपती आयवाळे, मारुती मोहिते, सुदर्शन चोडणकर, जोतीबा निऊंगरे आदी उपस्थित होते. संचालिका सुमित्रा येसणे यांनी सूत्रसंचालन, संचालिका सुवर्णा पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT