कोल्हापूर

अधिक मासारंभ

CD

17025
कोल्हापूर : अधिक मासानिमित्त मंगळवारपासून सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. उत्तरेश्वर विठ्ठल मंदिरात श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)

अधिक मासानिमित्त
विविध धार्मिक कार्यक्रम
ज्ञानश्‍वरी पारायणासह भागवत कथा, स्तोत्र पठणही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : पुरूषोत्तम (अधिक) मासानिमित्त आजपासून शहरातील विविध ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, सामुदायिक गीता स्तोत्रपठण आदी विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला. महिनाभर सर्वत्र हे कार्यक्रम होणार असून त्यातून अध्यात्मिक अनुभुती मिळणार आहे.
उत्तरेश्‍वर विठ्ठल मंदिरात आजपासून ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सोहळ्याला प्रारंभ झाला. सकाळी सातला वीणा व ग्रंथपूजन झाले. पहिल्या दिवशी शहाजी पाटील महाराज यांचे प्रवचन व किर्तन झाले. उद्या (बुधवारी) संजय सुतार महाराज, गुरूवारी (ता.२०) ऋषीकेश महाराज वास्कर, शुक्रवारी (ता.२१) गजानन गणबावले महाराज, शनिवारी (ता.२२) पांडूरंग उपलाणे महाराज, रविवारी (ता.२३) विठ्ठलदादा वास्कर महाराज यांचे प्रवचन व किर्तन होईल. सोमवारी (ता.२४) मधुसुदन बारटक्के महाराज यांचे काल्याचे किर्तन होवून सप्ताहाची सांगता होईल. दरम्यान, दररोज पहाटे चार ते सहा काकडा, सकाळी आठ ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण, दुपारी तीन वाजता मंचिरीगाथा पारायण, सायंकाळी चार वाजता सामुदायिक हरिपाठ आणि सातनंतर किर्तनाचे कार्यक्रम होतील.
----------------
चौकट
गुजराती भाषेतही
भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह
आर. के. नगरातील गीता संथा वर्गातर्फे जिजामाता सांस्कृतिक सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आजपासून धनंजयानंद देशपांडे यांच्या ‘भागवत कथाकार- भगवद भक्त'' या विषयावर कथा निरूपणाला प्रारंभ झाला. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा व सायंकाळी साडेचार ते सात या वेळेत २६ जुलैपर्यंत हा कार्यक्रम होईल. २३ जुलैलै सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत विष्णूयाग आणि साडेदहानंतर सामुदायिक गीता-स्तोत्र पठणाचा कार्यक्रम होईल. शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदिरात श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाला प्रारंभ झाला असून गोपी महिला मंडळातर्फे आयोजन केले आहे. दुपारी साडेतीन ते पाच यावेळेत गुजराती भाषेत अतुलभाई दवे कथा निरूपण करणार असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमिलाबेन शाह यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा इशारा |

अजय देवगनला भेटलो नाही, पण... 'दृश्यम ३' पाहून पहिल्या भागातच मेलेला सॅम म्हणतो- मी सिनेमात जिवंत असतो तर...

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

Marathi News Live Updates: नवी मुंबई विमानतळावरून पुणे, मुंबईसह विविध शहरांसाठी वाहतूक सुविधा वाढणार; सात ऑक्टोबरपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू

SCROLL FOR NEXT