कोल्हापूर

महापालिकेची आपत्तीव्यवस्थापन कक्ष

CD

पालिकेतर्फे सहा ठिकाणी
आपत्ती व्यवस्थापन कक्ष
कोल्हापूर, ता. १८ ः पावसाला सुरुवात झाली असल्याने शहरवासीयांच्या मदतीसाठी महापालिकेने चार विभागीय कार्यालयांसह सहा ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केले आहेत. त्या-त्या परिसरातील नागरिकांनी या कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पावसामध्ये पंचगंगा नदीला येणारा पूर, तसेच त्यामुळे नदीकाठावरील नागरी वस्तीला कायम फटका बसतो. या परिसरातील नागरिकांसाठी तसेच शहरात इतर ठिकाणी पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीत मदत करण्यासाठी पालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात येतात. महापालिकेच्या मुख्य इमारतीत अग्निशमन विभागाचा मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष (०२३१-२५४११८८, ८९५६४१२१०३) आहे. तसेच सासने मैदान येथे मुख्य नियंत्रण कक्ष (१०१, ०२३१-२५३७२२१, ८९५६४१२१०२) आहे.
याशिवाय चार विभागीय कार्यालयांमध्येही त्या परिसरासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केले आहेत. त्यामध्ये गांधी मैदान विभागीय कार्यालय (०२३१-२६२२२६२), छत्रपती शिवाजी मार्केट (०२३१-२५४३८४४), राजारामपुरी विभागीय कार्यालय (०२३१-२५२१६१५), छत्रपती ताराराणी मार्केट (०२३१-२५३००११,२५३६७२६) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT