कोल्हापूर

विद्यार्थ्याला मारहाण - शिक्षकावर गुन्हा दाखल

CD

विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा
कोल्हापूर, ता.१८ - निवासी शाळेतून पळून गेल्याच्या रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याबद्दल वाशी (ता.करवीर) येथील नवोदय ॲकॅडमीतील शिक्षकावर गुन्हा दाखल झाला. याची फिर्याद मुलाच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार शिक्षक शिवाजी पांडुरंग भावके (वय ३०,रा.कुराडेवाडी, पोस्ट वाघवे, ता.पन्हाळा) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की फिर्यादींचा मुलगा वाशी येथील नवोदय ॲकॅडमीत आठवड्यापासून आहे. त्याला आईची आठवण येत आहे, आईशी बोलायचे आहे म्हणून त्याने शिक्षकांना सांगितले होते. मात्र, शिक्षक आणि प्रशासनाने त्याला आईशी बोलू दिले नाही. त्यानंतर कळंटाळून चार दिवसानंतर त्याने तेथून पळ काढला आणि शेजारील घरी जावून लपला. तेथे त्याने आईचा मोबाईल नंबर देवून तिच्याशी बोलणे करून देण्याची विनंती केली. त्याचे आईशी बोलणे झाले तेव्हा आईने मुलाला बाहेर कोठेही सोडू नका, मी तेथे येत असल्याचे त्या कुटुंबीयांना सांगितले.
दरम्यान शिक्षक भावके यांना पळून गेलेला विद्यार्थी शेजारीच लपाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी त्याला शाळेत आणून बेदम मारहाण केली. त्याची आई तेथे पोचली. त्यांनी मुलाला तेथून सीपीआरमध्ये आणून वैद्यकीय तपासणी केली तेव्हा त्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे दिसले. यावेळी फिर्यादी आईने माध्यमांशी बोलताना शिक्षकाने मुलाला बांधून घालून मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर त्या करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्या. मात्र, तेथे काल हा गुन्हा दाखल झाला नाही. अखेर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार आज रात्री हा गुन्हा दाखल झाला.

चौकट
‘करवीर पोलिस ठाण्यात नोंद’
गुन्ह्याबाबत तपास अधिकारी विजय भिवटे यांनी सांगितले ,की संबंधित शिक्षक शिवाजी भावके यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अद्याप अटक झालेली नाही. काल सकाळी वाशी येथील नवोदय विद्यालयात ही घटना घडली आहे. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT