कोल्हापूर

खेळाडूंनी तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे

CD

खेळाडूंनी तंदुरुस्तीकडे लक्ष
द्यावे ः डॉ. फ्रँक बी. व्हेट

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय वेबिनार
कोल्हापूर, ता. १८ ः क्रीडापटूंनी शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक तंदुरुस्तीकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. खेळताना उद्भवणाऱ्या ताणतणावांचा सामना जितक्या सहजतेने करता येईल, तितका खेळ उंचावणे शक्य होईल. त्या दृष्टीने त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांच्या मानसिकतेवर काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील टेक्सास येथील मिड वेस्टर्न स्टेट विद्यापीठाचे प्राध्यापक व क्रीडातज्ज्ञ डॉ. फ्रँक बी. व्हेट यांनी काल येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि मीड वेस्टर्न स्टेट युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने काल (दि. १७) सायंकाळी ६ ते १० या कालावधीत ‘कॉम्पिटिटीव्ह स्पोर्टस् अँड ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज्’ या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले. यात डॉ. व्हेट हे ‘फिजिऑलॉजिकल थ्रेशोल्ड इन ट्रेनिंग दि कॉम्पिटिटीव्ह स्पोर्टस्’ या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. फ्रँक व्हेट म्हणाले, ‘भारतीय क्रीडापटू आणि प्रशिक्षक व मार्गदर्शक हे क्रीडापटूंच्या शारीरिक तंदुरुस्तीवर काम मोठ्या प्रमाणावर करतात. पण, त्यांचा भर हा केवळ स्नायूंच्या पिळदारपणावर आणि सक्षमतेकडे अधिक असते. तसे करणे योग्यच आहे. मात्र, त्याच्या बरोबरीने शरीरातील विविध संस्था, जसे की, रक्ताभिसरण, श्वासोच्छवास आदींच्या क्षमतावर्धनाकडेही लक्ष द्यावे.’
डॉ. सेथ स्केल्टन यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा शिक्षण कशा पद्धतीने घेता येते, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन केले. पल्लवी देसाई यांनी विविध विद्यापीठांमध्ये पदवी व पदव्युत्तर क्रीडा व शारीरिक शिक्षण कसे मिळवता येते, याबाबत मार्गदर्शन केले. अयोजन क्रीडा अधिविभागाने केले. डॉ. शरद बनसोडे यांनी वेबिनारचे संचालन केले. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गौरेश पवार, अक्षय कारेकर, डॉ. रोहित पाटील, पृथ्वीराज सरनाईक, सुचय खोपडे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE

SCROLL FOR NEXT