Almatti dam  esakal
कोल्हापूर

Kolhapur Flood Updates : आलमट्टीची काळजी नाही, पूरस्थितीवर लक्ष ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदेश

CD

कोल्हापूर, ता. २३ : कर्नाटकमधील आलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सध्यातरी मोठा पूर येईल, अशी भीती नाही. मात्र, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. ज्या-त्या गावातील अधिकाऱ्यांनी सतर्क राहून पूरस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांसह नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. कर्नाटकमधील आलमट्टी धरणामध्ये अजून अपेक्षित पाणीसाठा झाला नसल्यामुळे त्याची अजून तरी काळजी नाही. आलमट्टी धरण पन्नास टक्के भरत आल्यानंतर त्यांच्याशी समन्वय साधला जाईल. याचे नियोजन झाले आहे. सध्या मात्र कोल्हापूर जिल्ह्यातच जोरदार पाऊस सुरू आहे.

पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढत असली तरीही आज दुपारपर्यंत कोणाच्याही घरात पाणी शिरले आहे, अशी माहिती आलेली नाही. तरीही नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. बुधवारी (ता. २६) अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कधी यलो, तर कधी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. अतिवृष्टी असणाऱ्या आणि डोंगर पायथ्याखाली असणाऱ्या गावांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. अतिवृष्टी होत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी ज्या-त्या गावात दिवसातून तीनवेळा भेट देऊन डोंगरमाथ्यांची माहिती घ्यायची आहे. दरम्यान, आज पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरीही पाणी पातळीत वाढ होत आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT