कोल्हापूर

मोफत रोप वाटप उपक्रमाने दिवंगत मित्राला आदरांजली

CD

18880
गडहिंग्लज : दिवंगत संतोष शिंदे यांच्या दुनियादारी व माझं गडहिंग्लज ग्रुपमधील मित्रपरिवाराने स्वखर्चातून नागरिकांना १३०० रोपांचे मोफत वितरण केले.

मोफत रोप वाटप उपक्रमाने
दिवंगत मित्राला आदरांजली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : अलीकडील काही वर्षांपासून दरवर्षी नागरिकांना पाच हजारांवर मोफत रोप वाटप करणाऱ्या अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी गेल्या महिन्यात आत्महत्या केली. त्यांचे हे सामाजिक कार्य यावर्षीही अखंडित ठेवण्याचा निर्धार करुन त्यांच्या मित्रपरिवाराने स्वखर्चाने एक हजार मोफत रोप वाटप करुन त्यांना आदरांजली वाहिली.
कै. शिंदे यांनी उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवायचे. दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर मोफत रोप वाटपाचा उपक्रम हा त्यापैकीच एक. गेल्या महिन्यातच त्यांनी पत्नी व मुलासह आत्महत्या केली. त्या घटनेला एक महिना पूर्ण झालेल्या दिवशीच त्यांचा हा उपक्रम राबविण्याचे दुनियादारी व माझं गडहिंग्लज ग्रुपमधील मित्रपरिवाराने ठरविले. त्यांच्या निधनाने या उपक्रमात खंड न पडू देण्याचा निर्धार मित्रपरिवाराने केला आहे. सर्व मित्रांनी स्वखर्चातून सागवान, मोहगणी, आवळा, सिताफळ अशा विविध जातीच्या १३०० रोपांची खरेदी केली. निवृत्त वनपाल डी. बी. काटकर यांच्या मार्गदर्शनाने या रोपांचे वाटप करण्यात आले. या वेळी दुनियादारी व माझं गडहिंग्लज या ग्रुपमधील सर्व सदस्य उपस्थित होते. दिवंगत शिंदे यांच्या मित्रपरिवाराने मित्राने सुरु केलेला उपक्रम अखंडीत ठेवून अनोखी आदरांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT