कोल्हापूर

भरड धान्याच्या पदार्थांचे ‘शिवराज’मध्ये विक्री केंद्र

CD

19009
गडहिंग्लज : शिवराजमध्ये भरड धान्याचे पदार्थ विक्री केंद्राच्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. अनिल कुराडे, डॉ. एस. एम. कदम, बिनादेवी कुराडे, पौर्णिमा कुराडे आदी उपस्थित होते.

भरड धान्याच्या पदार्थांचे
‘शिवराज’मध्ये विक्री केंद्र
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : येथील शिवराज महाविद्यालयात पौष्टीक भरड धान्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांसह पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक मुक्ती जनजागृती करण्यात आली. त्यासंदर्भातच्या विक्री केंद्राचे उद्‍घाटन ‘शिवराज’चे सचिव डॉ. अनिल कुराडे व प्रा. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते.
डॉ. श्रद्धा पाटील यांनी सेल काउंटरबाबतचा हेतू स्पष्ट केला. विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच कला व व्यवहार गुणांचा विकास व्हावा यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. भरड धान्यापासून तयार केलेले पदार्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती व्हावी यासाठी पर्यावरणपूरक वस्तू वापराव्यात, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले. त्यासाठी कापडी पिशव्या बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या पिशव्या महाविद्यालयात वितरीत केल्या. पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिक ऐवजी स्टील बॉटल वापरण्याचे आवाहनही केले. या उपक्रमाची जनजागृती समाजात व्हावी यासाठी महाविद्यालय व्यवस्थापन, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक यांच्या सहभागाने हा उपक्रम राबविला जात असल्याचे सांगितले. या विक्री केंद्रात भरड धान्यापासूनचे पौष्टिक अन्नपदार्थ, कापडी पिशव्या, स्टेशनरी, पुस्तके, स्टील बॉटल, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक वस्तू, विविध झाडांची रोपे आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. पौर्णिमा कुराडे, डॉ. श्रद्धा पाटील, प्रा. नीळकंठ भोसले, डॉ. प्रवीण डोंगरे यांनी उपक्रमाचे संयोजन केले. सहसमन्वयक प्रा. पौर्णिमा कुराडे यांनी स्वागत केले. प्रा. साहिल समडोळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT