कोल्हापूर

आयडियल आर्यन्स कल्चरल ग्रुप पत्रकार परिषद

CD

आयडियल आर्यन्स ग्रुपतर्फे
उद्या शॉर्ट फिल्म स्पर्धा

कोल्हापूर ः आयडियल आर्यन्स कल्चरल ग्रुपच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. २८) दुपारी एक वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम होईल. सायंकाळी सात वाजता येथेच सत्कार सोहळा होईल. शरद कला व क्रीडा प्रतिष्ठान व आयडियल आर्यन्स कल्चरल ग्रुप यांच्यातर्फे हा कार्यक्रम होईल.
ग्रुपतर्फे हर्षल सुर्वे (गडकोट संवर्धन), राजुल लाईन्सवाला (विक्रमी रक्तदान), आकाश कोरगावकर (आयर्न मॅन), दत्तात्रय पोवार (वृक्षप्रेमी), ऋषिकेश परीट (वृक्षप्रेमी), अरुण शिंदे (ज्येष्ठ स्पॉट बॉय) यांच्यासोबत इम्तियाज बारगीर, मिलिंद अष्टेकर, सुनील मुसळे व सुगुन नाट्यसंस्था यांना गौरविण्यात येईल. तसेच आगामी पाच चित्रपटाच्या संघालाही यावेळी सन्मानित केले जाणार असून यामध्ये उमेश बगाडे (सिनेमन), संजय तोडकर (वहिवाट), अनुप जत्राटकर (गाभ), सुनील चौगुले (गाव लय शहाणं) आणि मकरंद लिंगनूर (शिवायन) या चित्रपटांचा समावेश आहे, अशी माहिती ग्रुपचे पांडुरंग गजगेश्वर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अजय खाडे, मकरंद लिंगनूरकर, सुरेखा पाखरे, प्रसाद देशपांडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

क्षुल्लक कारणावरून वाद, लाथाबुक्यांनी मारहाण करत बंदुकीचा धाक; शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठार मारण्याची धमकी; ठाण्यात काय घडलं?

Marathi News Live Updates: काढणीआधीच चार एकर ऊस जळून खाक; विद्युत तारांमधून ठिणगी पडल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Pune PMPML Security: सुरक्षेसाठी कोट्यवधींचा खर्च, तरी आगारांत सुरक्षारक्षकच नाहीत; पीएमपीएमएलचा धक्कादायक कारभार उघड

SCROLL FOR NEXT