कोल्हापूर

सीईओनी घेतला पूरपरिस्‍थितीचा आढावा

CD

00851
...

सीईओंनी घेतला पूरपरिस्‍थितीचा आढावा

आंबेवाडी, प्रयाग चिखलीला दिली भेट

कोल्हापूर, प्रयाग चिखली ता.२६: जिल्‍हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेत पूरपरिस्‍थितीचा आढावा घेतला. तसेच दुपारी पूरग्रस्‍त प्रयाग चिखली, आंबेवाडी (ता.करवीर) गावास भेट दिली. तर सोनतळी येथील जनावरांच्या छावणीला भेट देवून, केलेल्या सोयीसुविधांचीही त्यांनी माहिती घेतली.

जिल्‍ह्यात पूरपरिस्‍थिती निर्माण झाली आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातील परिस्‍थितीचा आढावा घेण्यासाठी श्री. पाटील यांनी खातेप्रमुखांसह गट विकास अधिकाऱ्यां‍ची बैठक घेतली. यावेळी जिल्‍हा प्रशासनाने दिलेल्या जबाबदाऱ्या‍ व त्यानुसार करण्यात येत असलेली कार्यवाही, याबाबत सविस्‍तर चर्चा झाली. पूरग्रस्‍त भागातील सद्यस्‍थिती, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना यावरही चर्चा करण्यात आली. यानंतर पाटील यांनी पूरग्रस्‍त प्रयाग चिखली, आंबवडे ग्रामपंचायतीस भेट दिली. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे गावामध्ये पूर येण्याची शक्यता आहे. तत्पुर्वीच संबंधित ग्रामस्‍थांचे स्‍थलांतरण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

पशुसंवर्धन विभागाने सोनतळी कॅम्‍पमध्ये जनावरांसाठी चारा छावणी तयार केली आहे. या ठिकाणी येणाऱ्या‍ जनावरांसाठी औषधासह चारा-पाण्याची व्यवस्‍थाही करण्यात आली आहे. या छावणीतील सुविधांची पाटील यांनी माहिती घेतली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अरुण जाधव उपस्‍थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT