कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा २० ऑक्टोबरपासून

CD

विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील
परीक्षा २० ऑक्टोबरपासून

वेळापत्रक जाहीर; पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश

कोल्हापूर, ता. २६ ः शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांचा प्रारंभ २० ऑक्टोबरपासून होणार आहे. त्यात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ५५८ परीक्षांचा समावेश आहे. त्यांचे वेळापत्रक आज परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जाहीर केले.
विद्यापीठाच्या सध्या मार्च-एप्रिल (उन्हाळी) सत्रातील परीक्षा सुरू आहेत. त्यामध्ये आजअखेर ५८३ अभ्यासक्रमांच्या परीक्षा होवून त्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अतिवृष्टीच्या इशारामुळे विद्यापीठाने आज आणि उद्या, गुरूवारच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. उन्हाळी सत्रातील परीक्षा शुक्रवारपासून पूर्ववत सुरू होणार आहे. या सत्रातील शेवटची परीक्षा ९ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यानंतर हिवाळी सत्रातील परीक्षा २० ऑक्टोबरपासून सुरू होतील. ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील पदवी पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा तारखा परीक्षा मंडळाकडून लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. सर्व परीक्षांचे अर्ज भरण्याची तारीख आणि शुल्क जाहीर केले जाणार असल्याचे परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghav Chadha: आम आदमी पार्टीला जबरदस्त धक्का! राघव चढ्ढांचा राजीनामा; दोन तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये जाण्याची घोषणा

Beed Walmik Karad: ''सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर '' बीडच्या जेलमधून नवीनच कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Viral Video : मी पण चाललो, तुम्ही पण निघा आता! मुंबई इंडियन्सचा पराभव दिसताच Akash Ambani यांनी चाहत्यांना केला इशारा

मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून वृद्ध वडिलांना अमानुष मारहाण, लघवीही पाजली...

MLC Election 2026: विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का! पराभूत दिग्गजांना 'नो एंट्री'; भाजपची ‘नो रिपीट’ पॉलिसी लागू

SCROLL FOR NEXT