कोल्हापूर

शहर पाऊस

CD

18787
शहरात पावसाचा जोर कमी
कोल्हापूर, ता. २६ ः शहरात पावसाचा जोर कमी झाला आहे. अधूनमधून कधी रिमझिम तर कधी एखादी मोठी सर पडत होती. सकाळी काहीकाळ सूर्यदर्शनही झाले; पण प्रशासनाकडून पूर वाढणार आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांनी बाहेर पडावे असे सांगितले जात आहे. त्यामुळे नदी तसेच जयंती नाल्याच्या काठावरील नागरिक अस्वस्थ झाले होते. अग्निशमन दलाचे जवानही सतर्क असून, रात्री पाणी अचानक वाढले तर नागरिकांना हलवण्यास मदत करणार आहेत.
सध्या ४० फूट ५ इंच पातळी असून, राधानगरी धरणातील पाणी रात्री पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे चार फूट पातळी वाढण्याचा अंदाज आहे. यानुसार पाणी वाढल्यास सुतारवाड्यात पाणी येणार आहे. सध्या बहुतांश कुटुंबे स्थलांतरीत झाली आहेत. अगदी बोटावर मोजण्याइतपतच कुटुंबे घरात आहेत. जर तिथे वेगाने पाणी वाढले तर त्यांना स्थलांतरीत करावे लागणार आहे. त्यासाठी अग्निशमन दल सज्ज आहे.
अनेक नागरिकांनी घरातील साहित्य उंचीवर ठेवले. वाहने सुरक्षितस्थळी हलवली असून महापालिकेच्या मैदानांवरही उभी केली आहेत. शहरातील पाऊस कमी झाला असून, कळंबा तलावही अजून भरलेला नाही. त्यामुळे लक्ष्मीपुरी, शाहूपुरीतील गल्ल्यांमध्ये जयंती नाल्यातील पुराचे पाणी या स्थितीत घुसणार नाही असा अग्निशमन दलाचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT