कोल्हापूर

दहशतवाद्यांचा गडहिंग्लज मुस्लिम बांधवांतर्फे निषेध

CD

20147
गडहिंग्लज : दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन मुस्लिम बांधवांनी नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांना दिले.

गडहिंग्लजला दहशतवाद्यांचा
मुस्लिम बांधवांतर्फे निषेध
गडहिंग्लज, ता. ३१ : इसिस या संघटनेशी निगडित असलेल्या चौघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. देशाशी गद्दारी करणाऱ्या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी येथील मुस्लिम बांधवांतर्फे करण्यात आली. या वेळी इसिस संघटनेशी निगडित असलेल्यांचा निषेध नोंदविला.
प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, इसिस संघटनेशी निगडित असलेले महमदइमरान खान, महमदयुनूस साकी, अदनान सरकार, झुल्फीकार बडोदावाला या चौघांना अटक केली आहे. देशात घातपाती कारवाया करून देशाची एकता, अखंडता, सुरक्षा, सार्वभौमत्व बिघडवण्याचा त्यांचा हेतू होता. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्याही घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. हा प्रकार देशविघातक असून मुस्लिम बांधवांतर्फे त्याचा निषेध नोंदवित आहे. एटीएस व एनआयएने याचा सखोल तपास करुन या दहशतवाद्यांना फाशी देण्याची मागणी आहे.
प्रा. आशपाक मकानदार, मौलाना अजीम पटेल, रफिक पटेल, रमजान अत्तार, खुतबुद्दीन अत्तार, युनूस नाईकवाडे, पी. एस. नदाफ, ताहीर कोचरगी, एम. एस. बोजगर, अमन मुल्ला, घुडूलाल शेख, सिकंदर यळकुद्रे, नवाब मालदार, जावेद बुडेखान, रफिक मुल्ला, मंजूर मकानदार, सादीक लमतुरे, सोहेल मकानदार, मकबुल नदाफ आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Chhatrapati Sambhajinagar: दोन कोटी लिटर पाणी आले पाइपलाइनमध्ये दुसऱ्या दिवशीही चाचणी : संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पोचले पाणी

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar: आझाद चौक रस्त्यावर ३२ अतिक्रमणे हटविली; दुकाने, शेड हटविले

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आतुर ! अमेरिकेने इराणला पाठवला १५ कलमी शांतता प्रस्ताव, काय आहेत अटी ?

SCROLL FOR NEXT