कोल्हापूर

रस्ता खुला स्वच्छता

CD

20172

जामदार क्लबजवळील स्थलांतरित
झालेले नागरिक परतले घरी

गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता खुला

कोल्हापूर, ता. ३१ ः पंचगंगा नदीचा पूर ओसरल्याने गंगावेश ते शिवाजी पूल हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्या रस्त्यावर आलेला कचरा स्वच्छ करत औषध फवारणी केली. जामदार क्लबजवळील स्थलांतरित झालेले नागरिक घरी परतले आहेत.
पंचगंगेच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद झाली होती. पातळी वाढत जाऊन जामदार क्लबपर्यंत पाणी आले होते. त्यामुळे तेथील अनेक कुटुंबे नातेवाईकांकडे स्थलांतरित झाली होती. काल पूर ओसरू लागल्यानंतर या रस्त्यावरील पाणी गायकवाड वाड्यापर्यंत पाठीमागे गेले. रात्रीत रस्त्यावरील पाणीही कमी झाले. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला.
सकाळी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रस्त्यावर पुरातून आलेला कचरा, गाळ पाणी मारून स्वच्छ केला. कालपासून अनेक घरांजवळील पाणी कमी झाल्याने स्थलांतरित झालेले नागरिक परतले होते. आज दिवसभर पाणी आलेल्या घरातील साहित्याची नागरिक स्वच्छता करत होते. रात्री उशिरापर्यंत घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी होते. उद्या सकाळपर्यंत पाणी पुन्हा वाढले नाही तर घाटाच्या परिसरातील असलेले पाणीही कमी होईल. सुतारवाड्याजवळीलही जयंती नाल्याचे पाणी पात्रात गेले आहे; पण चित्रदुर्ग मठात स्थलांतरित झालेले नागरिक अजून घरी गेलेले नाहीत. जामदार क्लब ते गायकवाड पुतळा ते तोरस्कर चौक, पंचगंगा रोड, सुतारवाडा, चित्रदुर्ग मठ, शिये रोड, कसबा बावडा, बापट कॅम्प कत्तल खाना परिसर येथे स्वच्छता करून औषध फवारणी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कीटकनाशक विभागाकडील आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे, वॉर्ड आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, शुभांगी पवार, महेश भोसले तसेच कर्मचाऱ्यांनी फवारणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : शिवेंद्रसिंहराजेंच्या बदनामीकारक पोस्टप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; 'आम्ही सातारकर' संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT