Rahul Rekhawar Esakal
कोल्हापूर

Ichalkaranji News : इचलकरंजीचे शिष्टमंडळ उद्या जिल्हाधिका-यांना भेटणार

दुधगंगा पाणी योजनेच्या गैरसमजाबाबत बाजू मांडणार; सर्वपक्षीय नेतेमंडळी सहभागी होणार

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : सुळकूड उद्भव असलेली दुधगंगा योजना मार्गी लावण्याबाबत इचलकरंजीतील एक व्यापक शिष्टमंडळ उद्या (मंगळवार) दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच भेट घेणार आहेत.

दुधगंगा (सुळकूड) योजना अंमलबजावणी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेट घेवून योजनेबाबत निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी आपली बाजू मांडणार आहे. कृती समितीचे निमंत्रीत विठ्ठल चोपडे यांनी ही माहिती दिली.

इचलकरंजी शहरासाठी अमृत दोन योजनेतून दुधगंगा योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. ही योजना दृष्टीपथात येत असतांनाच कागल मधील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी विरोध केला आहे.

दुधगंगा काठावरील कांही गावांनी यापूर्वीच आपला विरोध नोंदविला आहे. आता नेतेमंडळींचाही विरोध झाल्यांने या योजनेचे पुढे काय, असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तर मंत्री मुश्रीफ यांच्या भूमिकेबद्दल इचलकरंजीतून समाज माध्यमाव्दारे कडवट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच स्थानिक राजकीय नेतेमंडळींनाही नेटक-यांनी लक्ष्य केले होते.

या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय नेतेमंडळींनी पाणी प्रश्नी हालचाली सुरु केल्या आहेत. ही योजना मार्गी न लागल्यास भविष्यात इचलकरंजीसाठी एकही नविन पाणी योजना होणार नाही. किंबहूना शहरात पुढील भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

त्यासाठी या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी उद्या (मंगळवार) दुपारी १२.३० वाजता व्यापक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेवून आपल्या भावना मांडणार आहेत. यामध्ये या योजनेबाबत निर्माण झालेला गैरसमज आणि वस्तूस्थीती याची शास्त्रोक्त मांडणी शिष्टमंडळातील सदस्य करणार आहेत.

दुधगंगा योजनेबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी रेखावार हे शासनाला पाठविणार आहेत. त्यामुळे इचलकरंजीकरांची भूमिकाही महत्वाची आहे. त्यामुळे या योजनेची गरज यावेळी मांडली जाणार आहे.

या शिष्टमंडळात खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असणार असल्याचे निमंत्रक चोपडे यांनी सांगीतले.

पाणी प्रश्नावर जागृती

इचलकरंजीतील पाणी प्रश्नावर समाज माध्यमातून ऊहापोह केला जात आहे. इचलकरंजीसाठी ही योजना का गरजेची आहे, याची मांडणी केली जात आहे. याबाबत नागरिकांतही जागृती केली जात आहे. यासाठी युवा वर्ग कार्यरत झाला आहे. पुढील काळात पाणी प्रश्नावर लढा सनदशीर मार्गाने लढा उभारण्यावर सध्या विचारमंथन सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT