कोल्हापूर

पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे सादरीकरण

CD

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

घनकचरा प्रकल्‍प प्रभावीपणे राबवा

पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे सादरीकरण

कोल्‍हापूर, ता.३१: जिल्‍ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्‍थापन प्रकल्‍प प्रभावीपणे राबवा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या. जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन, स्‍वच्‍छ भारत मिशनच्या सादरीकरणावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी विभागाकडून उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी सादरीकरण केले.

जिल्‍हा परिषदेच्या सर्व विभागांना आपल्या कामाचे सादरीकरण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शनिवारी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाने सादरीकरण केले. तर सोमवारी (ता.३१) पाणी स्‍वच्‍छता विभागाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबा ग्रामस्‍वच्‍छता अभियान, सांडपाणी व घनकचरा व्यवस्‍थापन, ओडीएफ प्‍लस आदी योजनांवर सविस्‍तर चर्चा झाली. जिल्‍ह्यात यापूर्वी या योजनेतून करण्यात आलेले काम तसेच पुढील नियोजन याची माहिती घेण्यात आली.

ग्रामीण भागात पंचगंगा नदी प्रदूषण, सांडपाणी व घनकचरा व्यव्यस्‍थापनाचा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. यावर प्रभावी काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे प्रकल्‍प गावस्‍तरावर राबवत असताना ते काटेकोर राबवणे आवश्यक आहे. या प्रकल्‍पांचा ग्रामस्‍थांना पुरेपूर उपयोग होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहारमध्ये सत्तेचा मोठा ट्विस्ट! नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण? ४ दिग्गज नेते रेसमध्ये; कोण मारणार बाजी?

Pune : पोलीस कोठडीत पूजा करायचीय! ऋषिकेश वैद्यची कोर्टाकडे अजब मागणी

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

SCROLL FOR NEXT