कोल्हापूर

पालकमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी

CD

कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्याची सुबुद्धी
साईबाबांनीच पालकमंत्र्यांना द्यावी
कोल्हापूर, ता. ३१ ः कोल्हापूरकरांना भेडसावणाऱ्या अडचणी, प्रश्‍न सोडवण्याची सुबुद्धी साईबाबांनीच पालकमंत्र्यांना द्यावी, असा टोला लगावणारे पत्रक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढलेली पाहता साईबाबांजवळ प्रार्थना केली. त्यामुळे पंचगंगेला पूर आला नाही; असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेणाऱ्या पत्रकात म्हटले आहे, कोल्हापूरचे रखडलेले प्रश्न पाहता पालकमंत्र्यांना साईबाबांनी सुबुद्धी दिल्याशिवाय ते प्रश्न सुटतील का? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. पालकमंत्र्यांच्या निव्वळ घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी साईबाबांनीच बुद्धी द्यायला हवी, हे जनतेला समजले आहे. आमचीही साईबाबांवर श्रद्धा आहे. त्यांचे भाविक आज शहरात खड्ड्यातून ये-जा करतात. पाणी पुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. कचऱ्यांचे ढीग असून अस्ताव्यस्त पार्किंग आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था आहे. कोल्हापूरचा पाणीप्रश्न माजी पालकमंत्र्यांचाच आहे, असे समजून ते ढुंकूनही पहात नाहीत. तीन महिने प्रशासक नसल्याने विविध प्रश्‍नांमध्ये कोल्हापूरकर अडकले आहेत. पालकमंत्री येतात आणि मोठ्या बाता करून निघून जातात. पालकमंत्र्यांनी साईबाबांबाबत श्रद्धा आहे हे जाणवून दिले. त्या साईबाबांकडेच पालकमंत्र्यांना कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्याची सुबुद्धी दे अशी प्रार्थना करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026! अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त

आजचे राशिभविष्य - 25 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2026

Hotel Gas Leakage : हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती; सिलेंडरने घेतला पेट, कोंढवा बुद्रुकमधील घटनेत दोन कामगार जखमी

SCROLL FOR NEXT