कोल्हापूर

कोर्ट ई फायलिंग प्रणाली अनावरण बातमी

CD

‘ई-फायलिंग’मुळे वकील स्वयंसिद्ध होतील
जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल; प्रणालीचे अनावरण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः नवीन गोष्टी स्वीकारणे, त्यासाठी पुढाकार घेणे हे कोल्हापूरकरांच्या रक्तातच आहे. त्यामुळेच ई-फायलिंग प्रणाली येथील वकील लवकरच आत्मसात करतील. ही प्रणाली पक्षकार आणि वकिलांसाठी लाभदायी आहे. यामुळे वकील स्वयंसिद्ध होतील, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी केले. आज त्यांच्या प्रमूख उपस्थितीत ई-फायलींग सेंटरचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष विवेक घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा झाला.
अग्रवाल म्हणाल्या, ‘न्यायालयीन कामकाज सहज, सुलभ आणि गतीने व्हावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ई फायलिंग सेंटर सुरू होत आहे. यामुळे न्यायालयीन कामकाजात आमूलाग्र बदल होतील. ई फायलींग प्रणाली परिवर्तनाची नांदी आहे. संगणकीय कामकाज करणाऱ्या नव्या पिढीला अशी प्रणाली शिकण्यासाठी फारसे परिश्रम घ्यावे लागणार नाहीत. ज्युनिअर व सीनिअर वकीलांनी ही प्रणाली शिकून घ्यावी.’
अध्यक्षस्थानावरून ॲड. विवेक घाटगे म्हणाले, ‘राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊन तेथे ई-फायलिंग सेंटर सुरू केले आहे. काही ठिकाणी नजीकच्या काळात सुरू होईल. कोल्हापुरातही हे सेंटर सुरू झाले ही आनंदाची बाब आहे. प्रत्येक तालुक्याच्या स्थानी असे सेंटर सुरू व्हावे असा मानस आहे. या सेंटरचा लाभ अधिकाधिक वकिलांनी घेऊन ई-फायलिंगसाठी स्वतःला सिद्ध करावे. ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन प्रणालीचा तत्काळ आणि सकारात्मकपणे स्वीकार करावा.’ यावेळी नवीन वकिलांना दिवाणी आणि फौजदारी कामकाजाची मार्गदर्शक पुस्तिका भेट देण्यात आली. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश १ पी. एफ. सय्यद, जिल्हा सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल, उपाध्यक्ष विजयसिंह पाटील, सचिव ॲड. तेजगोंडा पाटील, शिवाजीराव राणे, प्रकाश मोरे, राजेंद्र किंकर, प्रशांत शिंदे, दीपक उंडाळे, किरण मुंगळे, रवींद्र तोरसेंसह आजी-माजी अध्यक्ष व वकील मोठ्या संख्येने हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT