कोल्हापूर

वाहन, मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक

CD

20271
...

दुचाकी, मोबाईल चोरणाऱ्या
सराईत चोरट्यास अटक

कोल्हापूर, ता. ३१ ः मध्यवर्ती बसस्थानक, शाहूपुरी या परिसरातून दुचाकी, मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आज शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी, मोबईल असा सुमारे ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विजय सतीश कांबळे (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून शनिवारी (ता. २९) एका महाविद्यालयीन युवतीचा मोबाईल चोरीला गेला. याबाबतची फिर्याद तिने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील चोऱ्यांच्या गुन्ह्यातील संशयितांची माहिती घेतली. यावेळी त्यांना चोरीचे मोबाईल विकणारा एकजण सासने ग्राउंड परिसरात संध्याकाळी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. त्यावेळी दुचाकीवरून एक व्यक्ती येथे आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या व्यक्तीचा वावर संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती म्हणजे सराईत गुन्हेगार विजय कांबळे असल्याचे लक्षात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील दुचाकी ही काही दिवसांपूर्वी शाहूपुरी २ री गल्ली येथून चोरल्याचे त्याने कबूल केले. तसेच त्याच्याकडील मोबाईलही चोरीचा असल्याचे त्याने सांगितले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली प्रमोद चव्हाण, संदीप जाधव, मिलिंद बांगर, लखन पाटील, शुभम संकपाळ, बाबा ठाकणे, विकास चौगले, रवी आंबेकर, अमर सायेकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Narsapur Case Verdict: नरसापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भिमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

IPO Investment: पहिल्याच दिवशी पैसाच झाला दुप्पट! 208 रुपयांचा शेअर थेट 415 रुपयांवर; IPO गुंतवणूकदार मालामाल

देणग्या आणि व्यवहारांचा हिशोब द्या! PMOकडून मागणी, पण राम मंदिर ट्रस्टचा नकार

Latest Marathi News Live Update : नसरापूरचा नराधम दोषी, शिक्षेची सुनावणी २९ जूनला

Massive Earthquake: मैदानात सामना सुरू होता अन् अचानक जमीन हादरू लागली... तीव्र भूकंपावेळीचा Video Viral

SCROLL FOR NEXT