कोल्हापूर

हमीपत्र द्या, रोपे घ्या

CD

20282

इचलकरंजी ः महापालिकेने नागरिकांना विविध प्रकारची रोपे मोफत उपलब्ध करुन दिली आहेत. शहिद भगतसिंग उद्यानात ही रोपे ठेवण्यात आली आहेत.

हमीपत्र द्या, रोपे घ्या
महापालिकेचे हरीत इचलकरंजीला बळः नागरिकांचा चांगला प्रतिसाद

इचलकरंजी, ता. ३१ ः इचलकरंजी महापालिकेने नागरिकांच्या सक्रीय सहभागातून वृक्षारोपणाला बळ दिले आहे. यासाठी विविध प्रकारची रोपे नागरिकांना मोफत उपलब्ध करुन दिली आहेत. रोपांचे संगोपन करण्याची लेखी हमी नागरिकांकडून घेतली जात आहे. त्यानंतरच या रोपांचे वितरण करण्यात येत आहे. या उपक्रमातून इचलकरंजी शहर हरीत होण्यास मोठी मदत होणार आहे.
इचलकरंजी औद्यगिक नगरी आहे. त्यामुळे शहरात प्रदूषणाची तीव्रता तुलनेने जास्त आहे. त्यामुळे हरीत इचलकरंजी संकल्पना राबवणे अत्यंत महत्वाचे आहे. सद्यस्थितीत शहरात खूपच वृक्षसंपदा आहे. त्यामुळे वृक्ष लागवड ही अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी महापालिकेने माझी वसुंधरा योजने अंतर्गत वर्षभरात किमान पाच हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चीत केले आहे.
यासाठी नागरिकांना मागणीनुसार मोफत रोपे उपलब्ध करुन दिली जात आहेत. कागल येथील शासकीय नर्सरीमधून महापालिकेने ४५६७ रोपे खरेदी केलेली आहेत. रोपे लावल्यानंतर ती जगावीत, यासाठी दोन ते चार फुटांची ही रोपे आहेत. नागरिकांना अंगणासह उपलब्ध जागेवर ही रोपे लावता येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. मोठ्या प्रमाणात रोपांची मागणी नागरिक करीत आहेत. मात्र दिलेले प्रत्येक रोप जगले पाहिजे, ही भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे सुरुवातील मागणी प्रमाणे १० ते १५ रोपे देण्यात आली आहेत. मात्र आता प्रतिसाद पाहून प्रत्येकांना पाच रोपे दिली जात आहेत.
आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त तैमूर मुल्लाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, वृक्ष अधिकारी संपत चव्हाण यांच्यासह अशोक काकडे, महेश बुचडे, दिलीप मगदूम, मंजुनाथ खंदारे, विशाल माने आदी उद्यानाकडील कर्मचारी याचे नियोजन करीत आहेत. सहाय्यक आयुक्त केतन गुजर यांनी या उपक्रमांवर नियंत्रण ठेवले आहे.
-------
तीन दिवसांत ९६० रोपांचे वाटप
गेल्या तीन दिवसांपासून रोपांचे वाटप सुरु केले आहे. भगतसिंग उद्यानात ही रोपे ठेवण्यात आली आहेत. गेल्या तीन दिवसांत विहीत प्रक्रीयेनंतर 960 रोपांचे वाटप केले आहे. उर्वरीत रोपांचेही वाटप सुरुच राहणार आहे.
------
मोफत रोपे मिळण्यासाठी
मोफत रोपे मिळण्यासाठी महापालिकेकडे मागणी कर्ज करावा लागणार आहे. सोबत रोपांची पूर्ण वाढ होईपर्यंत संगोपन करण्याचे हमीपत्रही सोबत द्यावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक दक्षता संबंधित नागरिकांना घ्यावे लागणार आहे. याबाबतच्या सर्व नोंदी महापालिकेकडे करण्यात येणार आहेत. कालांतराने त्याची पाहणीही केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT