कोल्हापूर

जागतिक  छायाचित्र दिन

CD

लोगो- जागतिक छायाचित्र दिन
........

छायाचित्र व्यवसायासाठी हवी कलात्मक दृष्टी

मोहन मेस्त्री ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः छायाचित्रण हा छंद किंवा व्यवसाय म्हणून जोपासला जात असला तरी त्यासाठी कलात्मक दृष्टी आवश्यक असते. सध्या व्यावसायिक छायाचित्रकारासाठी मोबाईल स्पर्धक ठरत असल्याचे चित्र आहे.


काही वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला आणि छायाचित्रणाची माध्यमेही बदलली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल असा हा प्रवास झाला.टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता येऊ लागले तरी कलेतील आकर्षण कायम आहे. कॅमेरा धरून बटन दाबले की फोटो येतो. पण, त्यासाठी अगोदर योग्य शटर स्पीड, ऍपारचर, आयएसओ, व्हाईट बॅलन्स, संपूर्ण विषय किंवा त्यावर पडलेली लाईट, फोटोच्या चौकटीमध्ये योग्य पद्धतीने बसवणे व ज्या व्यक्ती किंवा वस्तूचा फोटो काढावया आहे तो विषय समजला पाहिजे. एखाद्याला छायाचित्र कलेची संपूर्ण माहिती आहे म्हणून छायाचित्र चांगला येऊ शकत नाही. चांगला कॅमेरा, चांगली लेन्स असली तरी कॅमेऱ्यामागे संवेनदनशील, कलात्मक दृष्टीचा कॅमेरामन असावा लागतो.
निसर्गतः प्रत्येक प्राण्याला जन्मत: एक कॅमेरा मिळाला आहे. ज्यामुळे प्रत्येक वस्तूच्या छबीला आपल्या डोक्यात उतरवू शकते आणि तो कॅमेरा म्हणजे आपले डोळे. माणसाने  वैज्ञानिक आविष्कारातून कृत्रिम लेन्स निर्माण केली. या माध्यमातून छायाचित्रांना स्थायीरुपात समोर आणले. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे छायाचित्र काढणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. कॅमेरेही खिशाला परवडणारे आणि वापरण्यास सोपे झाले आहेत. मोबाईलचे कॅमेरे तर आता व्यावसायिक कॅमेऱ्याप्रमाणे गुणवत्तापूर्ण झाले आहेत. त्यामुळे फोटोग्राफी व्यावसायावर त्याचा परिणाम झाला आहे.

चौकट 
तीन पिढ्या व्यवसायात
कोल्हापुरातील छायाचित्र कलेला शंभर वर्षापासूनची शाहूकालीन परंपरा आहे. आराम कॉर्नरच्या शाहू रॉयल फोटो स्टुडिओचे ए. आर. पठाण, बिंदू चौकातील डी. डी. बराले फोटोग्राफर स्टुडिओ, बागल चौकातील बी. पी. पाटील, महाद्वार रोडवरील डी. एन. नायडू यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. पद्मा स्टुडिओचे गोविंद बेंद्रे, प्रतिमा स्टुडिओचे इब्राहिम अत्तार, दर्पण फोटो स्टुडिओचे एस. बी. टाकळकर यांच्या अगदी तीन पिढ्या कार्यरत आहेत. दरम्यान, फ्रान्सने १९ ऑगष्ट १८३९ ला फोटोग्राफी या आविष्काराला मान्यता दिली. तेव्हापासून १९ ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: "निवडणुकांमध्ये मतदान न केल्यास अटक होणार..."; कोर्टाच्या निर्णयाने चित्र बदललं, CJI सूर्यकांत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : चंद्रपूर दौऱ्यात पंकजा मुंडेंनाही औद्योगिक प्रदूषणाचा फटका; वाहनांवर काळ्या धुळीचा थर

Traffic Rules: ई-चालान ४५ दिवसांत भरा, नाहीतर...; केंद्र सरकारकडून नवे ट्रॅफिक नियम लागू, वाहनचालकांसाठी इशारा

Police Misconduct : पोलिस कर्मचाऱ्यांचा दारूच्या नशेत हॉस्पिटलमध्ये धिंगाणा; रुग्णांच्या बेडवर लोळले, डस्टबिनमध्ये लघवी केली अन्....

प्राजक्ता माळीने केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक, म्हणाली...'त्याच्या बोलण्यातून कधीच चुकीचा शब्द...'

SCROLL FOR NEXT