कोल्हापूर

वेश्‍या व्यवसाय- दोघांना अटक

CD

24261
---
वेश्‍या व्यवसायाला प्रवृत्त
केल्याबद्दल दोघांना अटक

कोल्हापूर, ता. १८ ः आर्थिक लाभाचे आमिष दाखवून महिलेस वेश्‍या व्यवसायाला प्रवृत्त केल्याबद्दल लॉज मालकासह एजंट महिलेला अटक करण्यात आली. जोया शाबाज मोमीन (वय २९, रा. कनाननगर) आणि सुनील विजय नाकील (वय ५३, रा. स्टेशन रोड, शाहूपुरी) अशी त्यांची नावे आहेत. शाहूपुरी पोलिसांनी काल रात्री पावणेबाराच्या सुमारास ही कारवाई केली. अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेशन रोडवरील एका दुकानासमोर तसेच शाहूपुरीतील एका लॉजमध्ये काल रात्री पावणेबाराच्या सुमारास पंटर, दोन पंचांसह पोलिसांनी छापा टाकला. तेंव्हा तेथे संशयित आरोपी जोया मोमीन हिने स्वतःच्या व लॉज मालक सुनील नाकील याच्या फायद्यासाठी पीडित महिलेस आर्थिक आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे दिसून आले. एजंट महिला मोमीन आणि लॉज मालक नाकील यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. दोन्ही संशयित आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीता शेळके, तानाजी चौगुले, वैजयंती हावळ, वनिता घारगे, शिल्पा आडके, नारायण कोरवी, महेश नाईक, महेंद्र पाटील, कृष्णात पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे प्रमोद चव्हाण, संदीप जाधव, मिलिंद बांगर, लखन पाटील, विकास चौगुले, शुभम संकपाळ, रवी आंबेकर यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT