जिल्हा परिषद ... लोगो
...
‘लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी
उपाययोजना करा’
कोल्हापूर, ता.१८: जिल्ह्यातील गायवर्गीय जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या आजारात जनावरे दगावण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेण्यासह गावागावात या आजाराबाबत जनजागृती करावी व प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. तसेच गावागावात खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.
लम्पी आजार हा विषाणूजन्य असून अत्यंत संसर्गजन्य असल्याने बाधित जनावरांचे प्रमाण वाढत आहे. या रोगाचा प्रसार चावणाऱ्या माशा, डास, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांशी संपर्क तसेच बाधित चारा व पाणी यामुळे होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे जनावरांचा गोठा निर्जंतुक ठेवणे आवश्यक आहे.
लम्पी आजाराला दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करण्यासह पशुपालकांना दवंडी, ग्रामवाहिनी या माध्यमातून आजाराबाबत जनजागृती करण्याच्या सूचना श्री.पाटील यांनी दिल्या आहेत. त्यातूनही जर पशुपालकांना त्यांच्या जनावरांमध्ये लम्पीसदृश लक्षणे आढळली तर मात्र तत्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.