कोल्हापूर

मराठा समाज

CD

सकल मराठा समाज
जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारणार

कोल्हापूर, ता. १८ : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मराठा आरक्षणप्रश्नी दोन समाजांमध्ये भेद निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्याने तोंड सांभाळून बोलावे. हा अधिकारी मराठा आरक्षणासाठी रक्त सांडलेल्या तरुणांचा अवमान करत आहे. त्यामुळे, अशा अधिकाऱ्याचा बोलवता धनी कोण? याचा जाब विचारण्यासाठी तसेच समाजभान नसणाऱ्या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २२) सकल मराठा समाज, कोल्हापूर शहर सर्वपक्षीय समिती व शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचाण्यासाठी धडक देणार असल्याची माहिती या संघटनांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, स्वातंत्र्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ मोठ्या अपेक्षेने गेले होते. चर्चा सुरू असताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दोन समाजांमध्ये भेद निर्माण करणारा सल्ला दिला. आरक्षण संदर्भात न्यायिक लढा सुरू आहे. त्यामुळे, अशा पात्रता आणि समाजभान नसलेल्या अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हेतू संबंधित अधिकाऱ्याचा आहे का? त्याच्यामागील खरा सूत्रधार कोण आहे? हे गृहखात्याने तपासणे महत्वाचे आहे. मराठा समाज सनदशीर मार्गाने आपल्या हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी लढा देत आहे. यामध्ये एखादा अधिकारी दोन समाजात तेढ निर्माण करत असेल तर त्या अधिकाऱ्याला भविष्यात योग्य धडा शिकवला जाईल. पत्रकावर ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, आर. के. पोवार, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले व सुनील मोदी यांची नावे आहेत.
...
प्रतिकात्मक पुतळे जाळले जातील
अधिकाऱ्यांनी मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण केल्यास अशा अधिकाऱ्यांचे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रतिकात्मक पुतळे जाळले जातील, याचे भान ठेवावे, असाही इशारा मराठा संघटना व अन्य पक्षांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT