कारखान्यांची नोंदणी,
परवान्यासाठी ऑनलाईन
अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर ः कारखान्यांनी नोंदणी आणि परवाना प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे कोल्हापूर विभागीय सहसंचालक अ. मो. अवसरे यांनी केले.
कारखाने अधिनियम १९४८ च्या कलम ८५ अन्वये ज्या ठिकाणी धोकादायक रसायनांचा, विषारी, ज्वलनशील अथवा स्फोटक पदार्थांचा वापर करून उत्पादन प्रक्रिया केली जाते. अशा ठिकाणी २० पेक्षा कमी कामगार असले, तरी कारखाने अधिनियमाच्या तरतुदी लागू होतात. अशा पद्धतीने सुरू असणाऱ्या कारखान्याची नोंदणी न करता आणि परवाना प्राप्त न करता कारखाना चालविणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. कोल्हापूर विभागाअंतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारखान्यांनी नोंदणी व परवाना प्राप्त करण्यासाठी (https:Ims.mahaonline.gov.in/maitri.mahaonline.gov.in) या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन अवसरे यांनी पत्रकाद्वारे केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.